World Whisky Day 2021: जाणून घ्या सेलिब्रेशन मागचं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

world whisky day

World Whisky Day 2021: जाणून घ्या सेलिब्रेशन मागचं कारण

World Whisky Day 2021: जगभरात अनेक दिवस साजरे होत असतात त्याच प्रमाणे व्हिस्की डे देखील साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी मे महिन्यातील तिसऱ्या शनिवारी जागतिक व्हिस्की दिन साजरा करण्याची परंपरा तयार होत आहे. 2012 मध्ये पहिल्यांदा हा दिवस जागतिक व्हिस्की डे म्हणून साजरा करण्यात आला. 2008 पासून 27 मार्च हा आंतरराष्ट्रीय व्हिस्की डे म्हणूनही साजरा करतात. सध्याच्या घडीला व्हिस्की ब्रँड हा जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध आहे. भारतामध्येही व्हिस्कीचे अनेक शौकिन आहेत. जाणून घेऊयात व्हिस्की डे सेलिब्रेशनचा इतिहास आणि त्यामागे दडलेलं कारण (You know about world whisky day 2021 history and importance of this day)

हेही वाचा: पोटदुखीपासून सर्दी-खोकल्यापर्यंत; ओव्याच्या पानांचे फायदे

व्हिस्की काय आहे?

व्हिस्की हे गुंगी आणणारे एक मादक द्रव्य आहे. गहू, काळी मोहरी आणि मक्का या धान्यांपासून व्हिस्की बनवली जाते. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात. अंकुर असलेल्या धान्यापासून तयार केलेल्या व्हिस्कीला माल्टा तर अंकुर नसलेल्या धान्यापासून बनवलेल्या व्हिस्कीला ग्रेन व्हिस्की म्हटले जाते. स्कॉटलंडमध्ये पहिल्यांदा व्हिस्की हा शब्दप्रयोग करण्यात आला. 15 व्या शतकातही व्हिस्की मिळत होती, असे मानले जाते. 18 व्या शतकापासून अमेरिकेत याच्या उत्पादनाला सुरुवात झाली. स्कॉटलंडची व्हिस्की ही सर्वात दर्जेदार मानली जाते. भारतासह जगभरातील अनेक देशात व्हिस्की तयार होते. मद्यपी हा दिवस उत्साहात साजरा करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देताना दिसते.

हेही वाचा: पुरुषांनी अनुभवला मासिक पाळीतील त्रास; वेदनांमुळे झाली पळताभुई

जागतिक व्हिस्की दिवसाचा इतिहास

2012 पासून जागतिक व्हिस्की दिन साजरा केला जातो. Blair Bowman यामागचा सूत्रधार आहे. University of Aberdeen मध्ये शिक्षण घेत असताना ब्लेयर यांनी लोकांना एकत्रित येऊन व्हिस्की डे साजरे करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी प्रत्येक वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून #WorldWhiskyDay हा उपक्रम राबवण्यात येतो. या हॅशटॅगच्या माध्यमातून जगभरातील लोक हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात.

Web Title: You Know About World Whisky Day 2021 History And Importance Of This

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :whisky
go to top