Makar Sankranti 2020 : नवजात बाळाला अन् सुनेला हलव्याच्या दागिन्यात सजवणारा सण

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

 जाणून घ्या मकर संक्रांतीच्या पंरपरेसंदर्भातील काही खास गोष्टी....   

संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ याला खूप महत्त्व आहे. थंडीच्या काळात हे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला त्याचा फायदा होतो. संक्रांतीच्या सणाला अनेक ठिकाणी पूरन पोळी केली जाते. तिळाचे लाडू किंवा वड्या देखील केल्या जातात. शेतीत वाटाणे, ओले आणि हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा बोर याचे उत्पादन होते. त्यामुळे या पदार्थांचं वाणं देण्याचीही परंपरा पाहायला मिळते. जाणून घ्या मकर संक्रांतीच्या पंरपरेसंदर्भातील काही खास गोष्टी....   

#वाणं सवाष्णीला देण्याची परंपराही पाहायला मिळते. देवाजवळ, तुळशीजवळ आणि तीन सवाष्णींना घरी बोलवून ही परंपरा जपली जाते. 

#लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणं' देण्याची प्रथा आहे. सवाष्णींना देवासमोर पाठावर बसवून तिळगूळ, हळदकुंकू यासह वाणं देण्याची पद्धती आहे. त्यावेळी एककेकींना वस्तू देण्याचीही रित आहे.  

Makar Sankranti 2021 : तिळा-गुळाच्या गट्टीचं काय आहे आरोग्यदायी महत्त्व? 

#लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू (कुंकवाचा करंडा, कंगवा, आरसा, बांगड्या, काळे मणी) या वस्तू दिल्या जातात.

#लग्नानंतर येणारी संक्रांत नवीन सुनेच्या कोडकौतुकाची असल्याचे मानले जाते. एवढेच नाही तर ही संक्रांत बाळाच्याही कौतुकाची असते. 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?

#नवीन सुनेला हलव्याचे दागिने घातले जातात. गळ्यात हार, मंगळसूत्र, बिंदी, कानातले, कंमरपट्टा, बाजूबंद यासारख्या अनेक प्रकारचे हलव्याचे दागिने कित्येक हौशी बायका करतात. 

#वर्षाच्या आतील बाळाला'बोरन्हाण' केलं जातं लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. त्याला काळं झबलं, अंगावर हलव्याचे दागिने घातले जातात.   

# जुन्या काळात नवीन येणारी सून वयाने फार लहान असायची. तिचे कौतुक करण्यासाठी हा सोहळा अगदी आनंदान साजरा केला जायचा. 

#त्यातून तिला लागणार्‍या गरजेच्या वस्तूही मिळतात आणि मैत्रिणींना भेटल्याचा आनंदही. त्याच काळात तिच्या बाळाच्या बोरन्हाणातून तीही आनंद मिळवत असे. म्हणूनच ही पहिली पाच वर्ष खर्‍या अर्थाने तिच्या आयुष्यात आनंदाची ठरत असावीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You Know Makar Sankranti Special Halwa Jewellery Festival