esakal | Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Makar_Sankranti

भारत देशात प्रत्येक सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही धार्मिक तसेच शास्त्रीय कारणंदेखील आहेत. कागदाचा पतंग आणि मांजाच्या सहाय्याने पतंग गुल करण्याची स्पर्धा रंगते.

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Makar Sankranti Festival : पुणे : मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ आणि तिळाचे लाडू एवढंच आपल्याला आठवतं. पण संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे, हे तुम्हाला माहित आहे का? गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या शहरी भागात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याचे प्रमाण वाढले आहे, पण ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशीच फक्त पतंग उडवला जातो. 

संक्रांतीच्या दिवशी दान आणि पुण्यासाठीचे कार्यक्रम केले जातात. मात्र अलीकडील काळात पतंग उडवण्याच्या स्पर्धाही भरवल्या जात आहेत. विविध आकारातील आणि आकर्षक असे पतंग संक्रांतीच्या दिवशी उडवले जातात. अनेक राज्यांमध्ये आता पतंग महोत्सवही भरवले जाऊ लागले आहेत. पण संक्रांतीला पतंग का उडवला जातो? असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया. 

तुमच्या व्यक्तीमत्वाची प्रत्येकानं दखल घ्यावी असं वाटतंय? मग 'या' गोष्टी नक्की करून बघा

भारत देशात प्रत्येक सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही धार्मिक तसेच शास्त्रीय कारणंदेखील आहेत. कागदाचा पतंग आणि मांजाच्या सहाय्याने पतंग गुल करण्याची स्पर्धा रंगते. जानेवारी महिना हा हिवाळा ऋतूमध्ये येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात अनेक आजारदेखील उद्भवतात. ऊन कमी असल्याने शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे शरीराची हालचाल व्हावी आणि आजारांनाही दूर ठेवावं यासाठी सूर्याची किरणं अंगावर पडणे गरजेचे असते. त्यामुळे पतंग उडवण्याचा उत्सव आयोजित केला जातो. 

2020 मध्ये लागलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर पडतील उपयोगी!​

लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकजण पतंगबाजीचा आनंद लुटतात. उत्तर भारतात पतंगाला गुड्डी म्हटले जाते. पतंग खुशी, उल्हास, स्वातंत्र आणि शुभ संदेशाचं प्रतीक आहे. संक्रांतीच्या दिवशी घरात अनेक शुभ कार्यांना सुरवात केली जाते. आणि हे शुभ काम सुंदर, निर्मल आणि अधिक चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी पतंग उडवली जाते. अनेकजण भारतीय तिरंग्याच्या प्रतिकृतीची झलक दाखविणारे पतंग उडवतात. 

पतंग उडविल्याने मन प्रसन्न आणि मेंदू संतुलित राहतो. उंच आकाशात पतंग उडवणे आणि त्याचवेळी तो कुणी काटून नेऊ नये, याचा विचार करणे आपल्याला नवीन विचार आणि शक्ती देते, त्यामुळे खूप पूर्वीपासूनच लोक पतंग उडवतात. 

2021 मध्ये आहेत बरेच Long Weekend Vacation, आतापासून करा प्लॅन​

संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हिवाळ्यात सूर्य किरणांची शरीराला गरज असते. असं मानलं जातं की, संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव प्रसन्न असतात, त्यामुळेही अनेकजण पतंग उडवतात. सूर्यकिरणांमध्ये ड जीवनसत्व असतं. आणि त्यामुळे शरीराला आवश्यक अशी ऊर्जादेखील मिळते. त्यामुळे सर्दी आणि खोकल्यासारखे आजार दूर राहतात. त्यामुळे तुम्हीदेखील निरोगी शरीर आणि प्रसन्न व्यक्तिमत्व राहावं, यासाठी पतंग उडवायला नक्कीच बाहेर पडा.

- लाइफस्टाइलसंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top