Hair: केराटिन ट्रीटमेंटसारखी चमक येईल तुमच्या केसांना फक्त 10 रुपयांत, हा रस फक्त तुम्ही केसांना लावा

फक्त दहा रुपये खर्च करून तुम्ही तुमच्या केसांना नवीन जीवन आणि चमक देऊ शकता.
Cucumber juice
Cucumber juice Esakal

तुम्ही तुमच्या केसांच्या कोरडेपणा कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आणि औषधी उपचार करुन भरपूर पैसे खर्च करून झाले आहेत, तरीही जर केसांचा कोरडेपणा जात नाही आहे. या केसांच्या समस्येमुळे तुम्ही हैराण आहात का?

जर होय, तर आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, जी केवळ 10 रुपयांमध्ये तुमच्या केसांना ती चमक आणि स्मूदनेस देऊ शकेलं.

आपल्या केसांचे कौतुक जर का कुणी करत असेल तर प्रत्येक स्त्रीला तीन शब्द ऐकायचे असतात. ते तीन शब्द म्हणजे हिचे केस किती लांब आहे , हिचे केस किती दाट आहे आणि हिचे केस किती काळे केस. पण या तीन शब्दांची स्तुती करताना अनेक महिला एक महत्त्वाची गोष्ट विसरतात, ती म्हणजे केसांची चमक आणि स्मूदनेस.

केस काळे, जाड आणि लांब असले पाहिजेत, पण जर ते कोरडे आणि निर्जीव असतील तर त्याचे कौतुक अपूर्ण राहते. अशा कोरड्या केसांचा लूक अपेक्षेप्रमाणे येत नाही. बरं, असे अनेक उपचार आहेत जे वापरून केसांचा कोरडेपणा दूर करता येतो. परंतु केसांमध्ये असे काहीतरी घालणे योग्य नसते. तसेच केसांना येणारी चमक ही तात्पुरती नसावी, तर केस लांब, काळेभोर आणि दाट असेपर्यंत ती चमक टिकून राहली पाहिजे. पण यासाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याचीही गरज नाही. फक्त दहा रुपये खर्च करून तुम्ही तुमच्या केसांना नवीन जीवन आणि चमक देऊ शकता.

Cucumber juice
Hair Care tips : केस हेल्दी करण्यासाठी हे ५ पॉईंट्स लक्षात ठेऊन वापरा ॲपल साइडर

जर तुम्हाला चमकदार केस हवे असतील तर तुम्हाला फक्त केसांना संजीवनी देण्यासाठी काकडी दहा रुपयांना बाजारातून विकत घ्यावी लागेल.

आता बघू या केसांची चमक वाढवण्यासाठी कशाप्रकारे काकडीचा वापर करावा लागेल?

● प्रथम, काकडी बारीक किसून घ्या आणि त्याचा रस पिळून घ्यावा. या तयार रसात एलोवेरा जेल घालावा नंतर थोडासा लिंबाचा रस घालावा नंतर सफरचंद सायडर व्हिनेगर देखील घालावे.या सर्व गोष्टी एका चमच्याच्या मदतीने चांगल्या एकजीव कराव्या.

● आता हा रस केसांना लावण्यासाठी तयार आहे. हा तयार रस केसांच्या मुळांवर लावून मसाज करावी. किमान एक तासभर केस तसेच ठेवावे. एका तासानंतर कोमट पाण्याने केस हलक्या हातांनी धुवून घ्यावे.

● हा असा रस आठवड्यातून किमान दोनदा तरी केसांना लावावा.केसांसाठी काकडीचा रस खूप फायदेशीर आहे. काकडी डोक्यावरच्या टाळूला हायड्रेट करते.

● याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी केसांचे पोषण करतात. यामुळे केसांना नवीन चमक येते आणि स्कॅल्पही निरोगी होते. केस देखील जास्त हायड्रेटेड होतात, जे त्यांना मऊ ठेवण्यास मदत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com