तो फक्त कॅमेरा ऑन करून झोपतो, आठवड्याला कमावतोय २ लाख रुपये!

तो फक्त कॅमेरा ऑन करून झोपतो, आठवड्याला कमावतोय २ लाख रुपये!

पैसे कमविण्यासाठी आज काल कोण काय करेल याचा नेम नाही. कोणी नोकरी करून तर कोणी व्यवसाय करून पैसे कमवते. पण एक असा व्यक्तीही आहे की जो गाढ झोपून पैसे कमावून खूप पैसे कमावतो. तुम्हाला हे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. या व्यक्तीने स्वत:च आगळ्या वेगळ्या कामाबाबतबाबत माहिती दिली आहे.

झोपण्यासाठी पैसे कमावणारा एक YouTuber आहे. याच्या YouTube चॅनेलचे नाव Super Mainstream आहे, जिथे तो एकटाचा झोपतानाचा आपला लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि मग यूट्यूबवर पोस्ट करतो. लोकांना हा व्हिडिओ पाहतात आणि त्याबदल्यात पैसे मिळतात. कसे ते जाणून घेऊ या..

तो फक्त कॅमेरा ऑन करून झोपतो, आठवड्याला कमावतोय २ लाख रुपये!
SWIFT कार नव्हे तर इकोनॉमिक वेपन; रशियाला लगाम घालणार?

YouTuber व्हिडीओमध्ये काय घडते?

झोपण्यासाठी पैसे कमाविणाऱ्या व्हिडिओमध्ये यूट्यूबर झोपण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे फॅन्स अॅलेक्सा स्पीकरमार्फत मेसेज, व्हिडिओ आणि गाणे लावून त्याला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न करताता. २१ वर्षीय युट्यूबरने Vice News सोबत बातचीत करताना सांगितले की, तो आठवड्यात एकदा ६ तास यूट्यूब लाईव्ही करून २००० रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावतो. म्हणजे आठवड्याला तो २ लाख रूपये कमावतो.

यूट्यूबवर त्याची स्लीप स्ट्रीम खूप लोकप्रिय होत आहे. त्याचे व्हिडिओला व्हयूज मिळत आहे. हजारो दर्शकांसमोर तो स्वत: लाईव्ह सुरू करून झोपून जातो. लोक त्याला मेसेज-फोन करून उठविण्याचा प्रयत्न करतात.

झोपण्यासाठी इतर लोक कमावतायेत पैसे

यूट्यूबवर आणि लोक झोपण्याच्या व्हिडिओद्वारे पैसे कमावत आहे. असे व्हिडिओज सध्याच्या काळात वाढत आहे. म्हणजेच केवळ एक आवश्यक शारीरिक क्रिया राहिलेली नाही.YouTube वरील स्लीप स्ट्रीममध्ये Interest असलेल्या लोकांची संख्या जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी (२०२०) याच कालावधीच्या तुलनेत यात ४२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com