

Zara vs Zudio battle for India fashion crown heats up
esakal
भारतीय फॅशन मार्केटमध्ये एका दशकांतच खळबळ उडाली आहे. स्पॅनिश फॅशन किंग झारा, ज्याने जगभरात वेगवान स्टाईलची लाट आणली, आता भारतीय मातीवर ताटकळत आहे. पण त्याला टक्कर देण्यासाठी टाटा ग्रुपच्या ट्रेंट कंपनीने आणलेल्या 'झुडियो'ने बाजार हादरवला आहे. कमी किंमत, तरुणाईला खिळवणारे डिझाईन आणि वेगवान विस्तार करत झुडियो आता 800 हून अधिक दुकानांसह 230 शहरांत धुमाकूळ घालतेय. FY25 मध्ये 220 नवीन दुकाने उघडून त्याने 1 अब्ज डॉलर (सुमारे 8300 कोटी रुपये) विक्री ओलांडली, तर झाराच्या भारतीय विक्रीपेक्षा तिप्पट जास्त कमाई केली