Loksabha Election 2024 : मावळ मतदारसंघात वाढले ७५ हजार मतदार

मावळ लोकसभा मतदारसंघात २३ जानेवारीपर्यंत २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार होते. मात्र, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज माघारी घेईपर्यंत अर्थात २९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार होती. या सव्वातीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हजार ५५७ मतदारांची नोंदणी झाली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात २३ जानेवारीपर्यंत २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार होते. मात्र, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज माघारी घेईपर्यंत अर्थात २९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार होती. या सव्वातीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हजार ५५७ मतदारांची नोंदणी झाली. त्यामुळे मावळ मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २५ लाख ८५ हजार १८ इतकी झाली आहे. त्यात १३ लाख ४९ हजार १८४ पुरुष, १२ लाख ३५ हजार, ६६१ महिला आणि १७३ तृतीयपंथींचा समावेश आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय मतदारांची संख्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी शनिवारी (ता. ११) दिली.

मावळ मतदार संघात सोमवारी (ता. १३) मतदान होत असून एक हजार ५५ इमारतींमध्ये दोन हजार ५६६ मतदान केंद्र निश्चित केली आहेत. त्यासाठी १४ हजार ३४९ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यात केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी एक ते तीन आणि मदतनीस प्रत्येकी दोन हजार ८४२ इतके आहेत. सुक्ष्म निरीक्षकांची संख्या ७६ आहे. तसेच मावळ मतदारसंघात ७५८ शासकीय सेवेतील मतदार आहेत. त्यात ७०८ पुरुष आणि ५० महिला आहेत. अनिवासी भारतीय मतदारांची संख्या ६३२ आहे. त्यात ४९५ पुरुष आणि १३७ महिला आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या २३ हजार ४७८ आहे. त्यात १२ हजार ९०९ पुरुष आणि १० हजार ५६९ महिला मतदार आहेत.

वयोगटानुसार मतदार मतदारांचे वय संख्या

नवमतदार ३५,३३१

२० ते ३९ वर्षे ११, ५२, ०८४

४० ते ५९ वर्षे ९, ८६, २८१

६० ते १०० वर्षे ४, ४०, ३१४

१०० वर्षांवरील १००८

विधानसभानिहाय मतदार

मतदारसंघ मतदार संख्या महिला तृतीयपंथी एकूण पुरुष

पनवेल ३,१७,०९६ २,७४,२३१ ७१ ५,९१,३९८

कर्जत १,५५,२८६ १,५३,९१७ ५ ३,०९,२०८

उरण १,६०,७०९ १,५८,५९३ ९ ३,१९,३११

मावळ १,९१,७०२ १,८१,६९३ १३ ३,७३,४०८

चिंचवड ३,२७,९६१ २,९०,२३९ ४५ ६,१८,२४५

पिंपरी १,९६,४३० १,७६,९८८ ३० ३,७३,४४८

एकूण १३,४९,१८४ १२,३५,६६१ १७३ २५,८५,०१८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com