Loksabha Election : वादग्रस्त कोतियात ७६.५३ टक्के मतदान ; आंध्र प्रदेश, ओडिशाकडून गावांवर दावा

आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडून दावा सांगितल्या जाणाऱ्या वादग्रस्त कोतिया ग्रामपंचायतीत लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उत्स्फूर्त मतदान झाले. सुमारे ७६.५३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

कोरापूत (ओडिशा) : आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडून दावा सांगितल्या जाणाऱ्या वादग्रस्त कोतिया ग्रामपंचायतीत लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उत्स्फूर्त मतदान झाले. सुमारे ७६.५३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी २०१९च्या निवडणुकीपेक्षाही चांगली असून २०१९ मध्ये ७४.७७ टक्के मतदान झाले होते.

यंदा एकूण ५,५०२ मतदारांपैकी ४,२१७ मतदारांनी मतदान केले. यात महिला मतदारांची संख्याही लक्षणीय असून २,९१३ महिला मतदारांपैकी २,१७२ महिलांनी मतदानात सहभाग नोंदविला. एकूण नऊ मतदान केंद्रांपैकी तालाकांती मतदान केंद्रावर सर्वाधिक ८९.५१ टक्के मतदानाची नोंद झाली.

Loksabha Election
Loksabha Election Voting : पुण्यात ३.४० टक्क्यांनी वाढ ;शिरूर, मावळ लोकसभेला मतदानाचा टक्का घसरला

त्यापाठोपाठ गुमेल पादर येथे ८९.४७ टक्के मतदान झाले. कोतियातील लोकांनी कोणत्याही दबाव किंवा भीतीशिवाय उत्स्फूर्तपणे मतदान केले, कोतिया ग्रामपंचायतीत एकूण २८ गावे असून त्यापैकी कोरापूत लोकसभा मतदारसंघातील पोट्टणगी विधानसभा मतदारसंघात येणारी २१ गावे आंध्र प्रदेश व ओडिशात वादाच्या केंद्रस्थानी आहेत.

हा वाद १९६८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यापासून सुरू आहे. २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यांच्या सीमांचा विषय आपल्या अधिकारक्षेत्राबाहेरचे सांगत संसदेनेच यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com