Loksabha Result : महायुतीसाठी विधानसभेच्या आव्हानांची झलक;मराठवाड्यातील ३३ मतदारसंघांत आघाडीला, तर ९ ठिकाणीच महायुतीला लीड

लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मराठवाड्यातील ८ पैकी ७ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले. या ८ लोकसभा मतदारसंघात एकूण ४८ विधानसभा मतदारसंघ अंतर्भूत होतात.
Loksabha Result
Loksabha Resultsakal

अनंत वैद्य : सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मराठवाड्यातील ८ पैकी ७ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले. या ८ लोकसभा मतदारसंघात एकूण ४८ विधानसभा मतदारसंघ अंतर्भूत होतात. उमरखेड आणि बार्शी हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळले तर ४६ मतदारसंघ मराठवाड्यातील आहेत. या ४६ मतदारसंघांपैकी ३३ ठिकाणी महाविकास आघाडी, ११ ठिकाणी महायुतीला तर दोन मतदारसंघांत एमआयएमला लीड मिळाली आहे. हे चित्र पाहता महायुतीला विधानसभा निवडणुकीदरम्यान मराठवाड्यात यश मिळवणे आव्हानात्मक असणार आहे.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने (ठाकरे) एकत्र लढत मराठवाड्यातील ८ पैकी ७ जागांवर यश प्राप्त केले होते. केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा ही एमआयएमने प्राप्त केली होती. याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीला भाजप व शिवसेना (ठाकरे) एकत्र सामोरे गेले होते.

त्यात २६ जागा भाजप तर २० जागा शिवसेनेने लढवल्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी २३ जागा लढवल्या. यात भाजप १६, सेनेला १२ जागा मिळाल्या तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ८ जागांवर यश मिळाले. एक ठिकाणी रासप व एक ठिकाणी डाव्या पक्षाला यश मिळाले होते.

दरम्यान राज्यात गेल्या काही वर्षांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली. सद्या काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एकत्र असून या महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले तर भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महायुतीला मोठा सेटबॅक बसला. केवळ एकच जागा त्यांच्या पदरात पडू शकली.

शिवाय या ८ लोकसभा मतदारसंघात अंतर्भूत होणाऱ्या केवळ ११ विधानसभा मतदारसंघांतच महायुतीला लीड प्राप्त झाली. ३३ मतदारसंघांत महाविकास आघाडीला यश मिळवता आले. संभाजीनगर मध्य आणि पूर्व या दोन मतदारसंघांत एमआयएमने मताधिक्य मिळवले. या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उत्साह चांगलाच दुणावला असून राज्यातील सत्ताधाऱ्यांना मराठवाडा काबीज करण्यासाठी मोठी शिकस्त करावी लागणार आहे.

असा आहे मतांचा फरक

मराठवाड्यातील ८ लोकसभा मतदारसंघात महायुतीला ३९ लाख ४० हजार १७९ इतके मतदान झाले तर महाविकास आघाडीने ४५ लाख ६५ हजार ८४२ मते मिळवली. वंचित बहुजन आघाडीने ५ लाख ८३ हजार ८६३ मते मिळवली. जालना येथे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी दीड लाखांवर मते घेतली. येणाऱ्या विधानसभेत या आकडेवारीचा आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करुनच राजकीय पक्षांना डावपेच आखावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com