राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत सोमवारी महत्त्वाची बैठक; अजितदादांसह नेतेमंडळी राहणार उपस्थित, काय आहे कारण?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Summary

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून ४ जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

Assembly Elections : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला चांगले यश मिळणार, अशी खात्री राज्याचा विद्यमान महायुती सरकारला असल्याने निकालानंतर याच यशाचा फायदा घेण्यासाठी आठवडाभरात विधानसभा बरखास्त करुन राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका घोषित केल्या जाऊ शकतात, असे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.

या दोन्ही गटांचे, तसेच महाराष्ट्रातील मतदारांचे कोण हारणार कोण जिंकणार याकडे लक्ष लागले असून ४ जूनच्या निकालात महायुतीला ३५ ते ३८ जागा मिळतील, असा महायुतीच्या नेत्यांकडून दावा केला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाची २७ तारखेला महत्वाची मिशन विधानसभा बैठक मुंबई येथे पार पडणार आहे.

Ajit Pawar
HSC Result : जुळ्या बहि‍णींनी एकत्र केला अभ्यास अन् बारावी परीक्षेत मिळवलं अनोखं जुळं यश, टक्के वाचून व्हाल शॉक

राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सोमवारी (ता. २७ मे) रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत गरवारे क्लब हाऊस, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीला मंत्री, आजी-माजी खासदार-आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांनी निमंत्रित केले असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com