Arunachal Pradesh Lok sabha election : लक्षवेधी लढत! 'टीम मोदी'मधील प्रभावी नेते किरेन रिजिजू यांना माजी मुख्यमंत्र्यांचं तगडं आव्हान

रिजिजू हे टीम मोदीमधील प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जातात. या आदिवासीबहुल मतदारसंघात हिंदू, ख्रिश्चनांप्रमाणेच इतर धर्मीयांचेही अस्तित्व आहे. मागील तीन वेळेस या घटकांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याने रिजिजू यांच्या विजयाची वाट सुकर झाली होती.
Arunachal Pradesh Lok sabha election
Arunachal Pradesh Lok sabha electionesakal

Arunachal Pradesh Lok sabha election 2024 : अरुणाचलप्रदेशच्या राजकारणावर फार पूर्वीपासून पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा प्रभाव राहिलेला आहे. या मतदारसंघामध्ये तवांग, पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग, पापूम पारे, लोअर सुबानसिरी, कुरूंग कुमे आदी जिल्ह्यांचा समावेश होतो. हा मतदारसंघ १९७७ मध्ये अस्तित्वात आल्यापासून सातवेळा काँग्रेसचा झेंडा फडकला असून तीनवेळा भाजपचा तर एकदा अपक्ष विजयी झाला आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा हा गड. यंदा या मतदारसंघातून आठ उमेदवार रिंगणात उतरले असले तरीसुद्धा खरी लढत ही रिजिजू आणि अरुणाचल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नबाम तुकी यांच्यातच आहे.

अरुणाचलमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) हे अन्य दोन पक्षही मैदानात असल्याने राजकीय फिव्हर शिगेला पोचला आहे.

मंत्री रिजिजू हे टीम मोदीमधील प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जातात. या आदिवासीबहुल मतदारसंघात हिंदू, ख्रिश्चनांप्रमाणेच इतर धर्मीयांचेही अस्तित्व आहे. मागील तीन वेळेस या घटकांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याने रिजिजू यांच्या विजयाची वाट सुकर झाली होती. काँग्रेसकडून मैदानात उतरलेले माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा स्थानिक पातळीवर मोठा प्रभाव असला तरीसुद्धा त्यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान असेल.

Arunachal Pradesh Lok sabha election
Satwik-Chirag Badminton: सात्विक-चिरागने रचला इतिहास! 'ही' कामगिरी करणारे पहिलेच भारतीय, सायना नेहवालचा विक्रमही मोडला

२०१९ चे चित्र

  • किरेन रिजिजू (भाजप) - मतेः २२५७९६

  • नबाम तुकी (काँग्रेस)- मतेः ५०९४३

  • जार्जुम एटे (जेडीएस)- मतेः ४३९२०

  • ख्योदा आपिल (एनपीईपी)- मतेः २७११९

  • विजयी उमेदवाराचे मताधिक्यः १७४८४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com