सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सँडवीच झालेल्या काँग्रेसला सहकार्याचा हात देवू.
Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar esakal
Summary

'नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी आनंद व्यक्त करण्याऐवजी नितीन गडकरींच्या पराभवाबद्दल दुःख व्यक्त केले.'

कऱ्हाड : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेमध्ये काँग्रेसचा सँडवीच झाला आहे. स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस पक्ष संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालला आहे. तो पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही. अशा काँग्रेस पक्षाला आम्ही सहकार्याचा हात देवू, असे स्पष्ट करुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे फक्त बाकी आहे, असा गौप्यस्फोट येथे केला. त्यामुळे हा बडा नेता कोण याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे.

Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar
Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी डॉ. आंबेडकर आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उमेदवार कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा महासचिव शरद गाडे आदी उपस्थित होते.

Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar

सातारा जिल्ह्यात वंचितने माजी सैनिक उमेदवार दिला आहे. कऱ्हाडच्या सभेत मोदी वीस मिनिटे सैनिकांवर बोलले. त्यामुळे आमची ही उमेदवारी भक्कम झाली असून, पंतप्रधानांनाही त्याची दखल घ्यावी लागली, ही जमेची बाजू आहे असल्याचे सांगून आंबेडकर यांनी जिल्ह्यात चाळीस हजार माजी सैनिक आहेत. त्यांनी प्रत्येकी दहा मते मिळवली, तरी चित्र काय होऊ शकते? हे दिसून येते असे सांगत वंचितच्या उमेदवारीच्या विजयाचा दावा केला.

Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar
काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार निपाणीत; म्हणाले, 'मोदींची हुकूमशाही किती दिवस सहन करणार'

ते पुढे म्हणाले, एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सँडवीच झालेल्या काँग्रेसला सहकार्याचा हात देवू. काँग्रेस (Congress) आणि उध्दव ठाकरेंनी बऱ्याच ठिकाणी तोडजोडीचे उमेदवार दिलेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी आनंद व्यक्त करण्याऐवजी नितीन गडकरींच्या पराभवाबद्दल दुःख व्यक्त केले. यावरून दोन्ही पक्षातील छुपा समझोता उघड झाला असून राज्यात काँग्रेस का लढू शकत नाही, याची कारणेही समोर येऊ लागली आहेत.

Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar
PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

दुर्दैवाने स्थानिक पक्ष आता विरोधी पक्ष होत आहे. मोदींच्या गॅरंटीची जनताच आता खिल्ली उडवत असून नोटबंदी, कर्जवाढ, बेरोजगारी, सरकारी मालमत्ता विकणे हीच मोदींची गॅरंटी असल्याचे लोक म्हणत आहेत. मोदींच्या या जुमल्यांना लोकांनी आणि स्थानिक पक्षांनी उध्वस्त करून टाकले आहे. पुण्यातील मोदींच्या सभेत ४० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. बरेच लोक अर्ध्यातून उठून गेले. यावरून २०१४ च्या निवडणुकीतील मोदींचा आता करिष्मा संपत चालला असल्याचेही शरसंधान आंबेडकर यांनी साधले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com