Belgaum Lok Sabha Constituency Election Results
Belgaum Lok Sabha Constituency Election Resultsesakal

Belgaum Lok Sabha Election Results : बेळगावात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांचा मोठा विजय; काँग्रेसच्या मृणाल हेबाळकरांचा पराभव

बेळगाव लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा मोठा विजय झाला आहे.
Summary

कर्नाटकात दोन टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. दुसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 14 जागांवर मतदान झालं. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातही 14 जागांवर मतदान झालं.

Belgaum Lok Sabha Constituency Election Results : बेळगाव लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी मोठा विजय मिळवला. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर शेट्टर यांनी आघाडी घेत दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सुमारे सव्वा लाखपेक्षा अधिक मताधिक्य घेतले होते.

बेळगाव लोकसभा मतदार संघात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत होती. यामुळे भाजप उमेदवार शेट्टर बाजी मारणार का काँग्रेस उमेदवार मृणाल हेबाळकर विजयी होणार? याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात होते. मात्र, प्रत्यक्षात शेट्टर यांनी लढत एकतर्फी केली. मतदार संघातून शेवच्या फेरीअखेर तब्बल दीड लाखपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन ते विजयी झाले.

जगदीश शेट्टर (भाजप)

मते : ७,६२,०२९

मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस)

मते : ५,८३,५९२

मृणाल हेब्बाळकर ५८३५९२

अशोक अप्पूगोळ ४३५०

बसप्पा कुंभार ५४०६

प्रजाकीय चोगला १४१३

लक्ष्मण जडगणावर १२८७

अश्‍पाकअहमद उस्ताद ६२२

अशोक हंजी ६६८

नितीन महादगुट १२८६

पुंडलिक इटनाळ १०६२

महादेव पाटील ९४२५

रवी पडसलगी ३९११

विजय मेत्राणी २८०४

एकूण १३७५५२८५

कर्नाटकात दोन टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. दुसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 14 जागांवर मतदान झालं. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातही 14 जागांवर मतदान झालं. या टप्प्यात देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर 65 टक्के मतदान झालं, तर कर्नाटकात 70.41 टक्क्यांहून अधिक मतदान झालं. बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.49 टक्के मतदान झालं.

Belgaum Lok Sabha Constituency Election Results
Chikkodi Lok Sabha Election Results : Not जोल्ले, Only जारकीहोळी! चिक्कोडीत प्रियांका जारकीहोळींचा दणदणीत विजय, भाजपचा मोठ्या फरकाने पराभव

बेळगाव लोकसभा मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar), राजू सेठ, महांतेश कौजलगी, विश्‍वास वैद्य व अशोक पट्टण हे पाच काँग्रेस आमदार आहेत. तर अभय पाटील, रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी हे तीन भाजपचे आमदार आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत. पक्षाने त्यांचे सुपुत्र मृणाल यांना लोकसभेची उमेदवारी दिली, तर भाजपने माजी मुख्यमंत्री जगदिश शट्टर यांना उमेदवारी दिली.

2019 च्या पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर 2021 मध्येही बेळगाव लोकसभा जागा भाजपनं जिंकली होती. एकेकाळी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. 1991 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या जागेवर काँग्रेसचेच उमेदवार विजयी होत होते. पण, हळूहळू काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आणि ही जागा त्यांना गमवावी लागली.

बेळगाव मतदारसंघाचा राजकीय इतिहास

1998 च्या निवडणुकीत या जागेवर पहिल्यांदाच भाजपचे खाते उघडले होते. बाबा गौडा पाटील 1998 मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर 1999 मध्ये काँग्रेसचे अमरसिंह पाटील विजयी झाले होते. मात्र, 2004 मध्ये भाजपनं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आणि सुरेश अंगडी खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सुरेश अंगडी 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग चार वेळा निवडून आले. तसेच 2021 च्या पोटनिवडणुकीत भाजपनं बाजी मारली आणि मंगला अंगडी विजयी होऊन लोकसभेत पोहोचल्या.

या जागेवर 1957 ते 1991 पर्यंत काँग्रेसची मक्तेदारी होती. पहिल्या निवडणुकीत बळवंतराव दातार खासदार म्हणून निवडून आले. बळवंतराव दातारही 1962 मध्ये विजयी झाले. त्यानंतर 1963 मध्ये हेमानंद कौजलागी, 1967 मध्ये एनएम नबिसाब, 1971 आणि 1977 मध्ये अप्पायप्पा कोत्राशेट्टी, 1984, 1989, 1991 मध्ये शनमुखप्पा सिदनाल हे सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1996 च्या निवडणुकीत जनता दलाचे शिवानंद कौजलागी यांनी काँग्रेसचा विजय रथ रोखला. मात्र, 1999 मध्ये काँग्रेसचे अमरसिंह पाटील विजयी झाले होते.

2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत बेळगावमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात 2019 मध्ये 67.43 टक्के मतदान झालं. भाजप उमेदवार सुरेश चन्नाबसप्पा अंगडी यांनी 7,61,991 मते मिळवून 3,91,304 मतांच्या फरकानं निवडणुकीत विजय मिळवला. सुरेश अंगडी यांनी INC च्या डॉ. साधुनावर यांचा पराभव केला, त्यांना 3,70,687 मतं मिळाली.

बेळगावात 12 लाख मतदार

2021 च्या आकडेवारीनुसार, बेळगावात एकूण 12 लाख मतदार आहेत. एकूण लोकसंख्या 22 लाख 19 हजार 346 आहे. या प्रदेशातील सुमारे 59 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते, तर 41 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. जातीय समीकरण पाहिल्यास येथील एससी लोकसंख्या 9.74 टक्के आहे आणि एसटी समाजाची लोकसंख्या 7.03 टक्के आहे.

2021 च्या पोटनिवडणुकीचा निकाल

मंगला सुरेश अंगडी - भाजप

मते – ४,४०,३२७

सतीश लक्ष्मणराव जारकीहोळी - काँग्रेस

मते – ४,३५,०८७

विजयाचे अंतर – ५,२४०

2019 निवडणूक निकाल

सुरेश अंगडी - भाजप

मते – ७,६१,९९१

व्ही. एस. साधुनावर - काँग्रेस

मते – ३७०,६८७

विजयाचे अंतर – ३,९१,३०४

2014 निवडणूक निकाल

सुरेश अंगडी - भाजप

मते – ५,५४,४१७

लक्ष्मी हेब्बाळकर - काँग्रेस

मते – ४७८,५५७

विजयाचे अंतर - 75,860

पुरुष मतदार 8,97,679

महिला मतदार 8,81,616

अन्य मतदार 55

एकूण मतदातर 17,79,350

बेळगाव लोकसभेचं जातीय समीकरण

बेळगाव एकूण लोकसंख्या 22,19,346

शहरी लोकसंख्या 40

ग्रामीण लोकसंख्या 60 टक्के

SC 10 टक्के

ST 7 टक्के

Gen/OBC 83 टक्के

हिंदू 85-90 टक्के

मुस्लिम 10-15 टक्के

ख्रिश्चन 0-5 टक्के

शीख 0-5 टक्के

बौद्ध 0-5 टक्के

जैन 0-5 टक्के

इतर 0-5 टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com