Chikkodi Lok Sabha Election Results : Not जोल्ले, Only जारकीहोळी! चिक्कोडीत प्रियांका जारकीहोळींचा दणदणीत विजय, भाजपचा मोठ्या फरकाने पराभव

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपला धक्का देत काँग्रेसने जागा पटकवली.
Chikkodi Lok Sabha Election Results
Chikkodi Lok Sabha Election Resultsesakal
Summary

या मतदारसंघात काँग्रेसकडून मंत्री सतीश जारकीहोळी यांची मुलगी रिंगणात राहिल्याने चुरस होईल, असे वाटत होते. पण, एकही फेरीत भाजपला मटधिक्क्य घेता आले नाही.

Chikkodi Lok Sabha Election Results : राज्याचे लक्ष लागलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपचा पराभव करत तरुण युवतीने धक्का दिला आहे. भाजपचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा काँग्रेसच्या प्रियंका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यांनी ९० हजार ८३४ मतांनी पराभव केला. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपला करिष्मा कायम ठेवत त्यांनी जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातील पकड आणखी मजबूत केल्याचे मानले जात आहे.

 • प्रियंका जारकीहोळी (काँग्रेस) मते : ७१३४६१

 • अण्णासाहेब जोल्ले (भाजप) मते : ६२२६२७

चिक्कोडीतील उमेदवारनिहाय मिळालेली मते

अण्णासाहेब जोल्ले ६२२६२७

प्रियंका जारकीहोळी ७१३४६१

आप्पासाहेब कुरणे ४६५६

कुमार डोंगरे ९४१

पवनकुमार माळगे ६६६

सत्याप्पा कलेळी १३१९

दुंडय्या हिरेमठ ६४७

काशीनाथ कुरणे ११०८

गजानन पुजारी ६००

जितेंद्र नेर्ले ४५७

भीमसेन सनदी ६१९

महेश कासार १००९

मोहन मोटन्नावर ९४६

यासीन पटकी १२८१

विलास मण्णूर ४१५०

शंभू कल्लोळकर २५४६६

श्रेणिक जंगटे ५१८१

सम्मेद वर्धमाने ५३५३

नोटा २६०८

एकूण १३९३०९३

कर्नाटकातील हायव्होल्टेज लढतीपैकी एक ठरलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत मतदानही चुरशीचे झाल्याने आजवरच्या मतदारसंघाच्या इतिहासात सर्वाधिक मतदान या निवडणुकीत नोंदवले गेले. जिल्ह्याचे नेतृत्व ठरविणारी ही निवडणूक असल्याने दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यातून फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न होत असतानाच अफवांचा बाजार तेजीत राहिल्याने उमेदवारांचीही धाकधूक वाढली होती. आज 4 जून रोजी मतदारराजाने कोणाला कौल दिला आहे हे स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच दोन्ही पक्षांमध्ये जे जे नेते नाराज आहेत, त्यांची चर्चा सुरु झाली होती. या नाराजांचा आम्हाला फायदा होणार असल्याचा दावा विरोधी पक्षांचे कार्यकर्ते करत होते. अशातच आता अमुक नेत्याकडून भाजपचा प्रचार, तमुक नेत्यांकडून शेवट टप्प्यात काँग्रेसचा प्रचार अशा पद्धतीच्या अनेक अफवा उठल्या. त्यात काहीसे तथ्यही असल्याने निकालाबाबत अधिकच उत्सुकता ताणली गेली. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत 'वाटप यंत्रणा' ही उमेदवारांच्या कामगारांकडूनच झाली. त्यामुळे बऱ्यापैकी नेते व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. यातूनही गावपातळीवरील नेत्यांनी काहीसा हात मारलाच.

या निवडणुकीत तुल्यबळ उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाल्याने जाहीर प्रचार सभांना यंदा 200 चा दर निघाला. त्यामुळे मतदानापूर्वी हजारपर्यंत दर निघण्याचा अंदाज वर्तवला जात होता. प्रत्यक्षात एक-दोन मतदारसंघ वगळता बहुतांशी मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी हातचे राखून समान न्यायाचे धोरण अवलंबले. या निवडणुकीत जात फॅक्टरचाही काहीसा परिणाम झाला आहे. मात्र तो कोणासाठी फायदेशीर ठरला आहे हे आता निकालावरुन स्पष्ट झालं आहे.

वाढत्या उन्हामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तीव्र राजकीय इर्षा आणि यातून कार्यकर्त्यांनी एक-एक मतासाठी लावलेले नियोजन याचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्का वाढला. मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी असणाऱ्या मतदारांचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने अशा मतदारांना आणण्याकडे कोणीही फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे परगावे असणाऱ्या मतदारांचे मतदान अत्यल्प झाले. चिकोडी मतदारसंघात सर्वाधिक लक्ष हे यमकनमर्डी, निपाणी आणि चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघाकडे होते. अपेक्षेप्रमाणे या तीनही मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.

गेल्या पंचवीस वर्षातील निवडणुकांचा विचार केल्यास 2009 चा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. त्याप्रमाणे यंदाच्या मतदानाने आजवरचे सर्वाधिक मतदान म्हणून विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे मतदारांची संख्या वाढली असताना मतदानाची टक्केवारीही वाढली आहे. समृद्ध लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही चांगली बाब आहे.

चिकोडी मतदारसंघातील आजवरचे लोकसभेचे मतदान

 • वर्ष एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारी

 • 1989 9 लाख 27 हजार 517 5 लाख 96 हजार 195 68.63

 • 1991 9 लाख 30 हजार 70 4 लाख 86 हजार 198 53.84

 • 1996 10 लाख 27 हजार 561 5 लाख 66 हजार 52 56.85

 • 1998 10 लाख 69 हजार 88 6 लाख 78 हजार 886 64.86

 • 1999 10 लाख 94 हजार 53 7 लाख 43 हजार 378 70.26

 • 2004 11 लाख 84 हजार 275 8 लाख 36 हजार 452 70.60

 • 2009 12 लाख 84 हजार 427 8 लाख 67 हजार 802 67.56

 • 2014 14 लाख 42 हजार 206 10 लाख 71 हजार 103 74.27

 • 2019 16 लाख 12 हजार 556 12 लाख 17 हजार 549 75.52

 • 2024 17 लाख 61 हजार 694 13 लाख 83 हजार 105 78.51

2019 मध्ये भाजपला सात मतदारसंघांत मताधिक्य

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीची चिकोडी मतदारसंघातून भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले हे लाखावर मताधिक्याने विजयी झाले होते. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा आणि नवा चेहरा याचा येथे भाजपला फायदा झाला. मात्र तरीही इतक्या मोठ्या मताधिक्याचा अंदाज राजकीय जाणकारांनाही नव्हता. चिकोडी लोकसभेच्या व्याप्तीत येणाऱ्या आठपैकी चिकोडी-सदलगा वगळता तब्बल आठ मतदारसंघांत भाजपला मताधिक्य मिळाले होते.

गेल्या पाच वर्षात मात्र अनेक राजकीय उलथापालथी झाल्यामुळे काँग्रेससाठीही पोषक वातावरण बनले. गत निवडणुकीत काँग्रेसने तत्कालीन खासदार प्रकाश हुक्केरी यांना पुन्हा रिंगणात उतरवले होते. तर, भाजपकडून 2014 च्या निवडणुकीत केवळ तीन हजार मतांनी पराभूत झालेल्या रमेश कत्ती यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने नवा चेहरा म्हणून अण्णासाहेब जोल्ले यांना रिंगणात उतरवले. त्याला 2018 च्या विधानसभा निवडणुकीत चिकोडी-सदलगा मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले यांनी दिलेली कडवी लढत कारणीभूत ठरली. 2018 च्या विधानसभेला एकीकडे निपाणीतून आमदार शशिकला जोल्ले यांना उमेदवारी देण्यात आली होती.

तर, दुसरीकडे चिकोडी-सदलगा मतदारसंघातून भाजपकडून फारसे कोणी इच्छुक नसताना अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत जोल्ले यांना दहा हजार मतांनी पराभूत स्वीकारावा लागला तरी त्यांनी एकहाती असलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्यात 80 हजारावर घेतलेली मते त्यांना लोकसभा उमेदवारी मिळवून देण्यास कारणीभूत ठरली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चिकोडी मतदारसंघात राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडल्या. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने निवडणुकीचा नूर बऱ्यापैकी पालटला. अंतिम निकालात भाजपच्या अण्णासाहेब जोल्ले यांनी मोठे मताधिक्य घेतले. काँग्रेसला केवळ चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. विशेष म्हणजे, अथणी मतदारसंघात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या महेश कुमठहळी यांनी भाजपच्या लक्ष्मण सवदी यांचा 2300 मतांनी पराभव केला होता.

मात्र, त्यानंतर वर्षभरातच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अथणीत 33 हजार 500 चे मताधिक्य मिळाले. कागवाड मतदारसंघात काँग्रेसतर्फे श्रीमंत पाटील यांनी विधानसभेला भाजपच्या राजू कागे यांचा तब्बल 33 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला सुमारे 18 हजारांचे मताधिक्य मिळाले. लोकसभेनंतर दोन महिन्यांनी राज्यात झालेल्या सत्तांतराची चाहूल म्हणूनच या मताधिक्क्याकडे पाहता येईल.

यमकनमर्डी मतदारसंघात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांना केवळ 2850 मतांनी विजय मिळाला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघात भाजपला सुमारे 2800 इतके मताधिक्य मिळाले. याव्यतिरिक्त निपाणी विधानसभा मतदारसंघात भाजपला सुमारे 11,700, कुडची मतदारसंघात 13 हजारांचे, रायबाग मतदारसंघात 21 हजारांचे तर हुक्केरी मतदारसंघात सुमारे 31 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. गेल्या पाच वर्षात लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. लक्ष्मण सवदी, राजू कागे हे काँग्रेसवासी झाले. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांची संख्या पाचपर्यंत वाढली. या सर्वांचा परिणाम म्हणून यंदा निवडणुकीत तुल्यबळ लढत पाहायला मिळाली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मतदान

मतदारसंघ भाजप काँग्रेस

निपाणी 86,653 74,909

चिकोडी-सदलगा 76,824 91,685

अथणी 95,593 62,070

कागवाड 76,152 58,360

कुडची 67,339 54,262

रायबाग 79,236 58,015

हुक्केरी 84,696 53,640

यमकनमर्डी 74,739 71,930

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com