Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav

Lalu Yadav : जहानाबाद लोकसभेच्या जागेवरुन लालू यादवांचं टेन्शन वाढलं; आरजेडीच्या बंडखोराचा उमेदवारी अर्ज...

या मतदारसंघात एकामागोमाग एक घडामोडी घडत आहेत. मुनिलाल यादव यांच्या उमेदवारीच्याही अगोदर एनडीएमध्ये सहभागी झालेल्या लोजपाचे नेते अरुण कुमार यांनी पक्षाला रामराम ठोकून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे.

Bihar Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बिहारच्या जहानाबाद येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १ जून रोजी जहानाबाद येथे मतदान होणार असून जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतशी रंजकता वाढत चालली आहे.

एनडीएमधल्या जेडीयूचे उमेदवार चंद्रेश्वर चंद्रवंशी आणि महाआघाडीतील आरजेडीचे उमेदवार सुरेंद्र यादव यांच्यात थेट लढत होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता या मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय. आरजेडीचे प्रदेश महासचिव आणि माजी आमदार मुनिलाल यादव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

 Lalu Prasad Yadav
RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

राजदचे माजी आमदार आणि प्रदेश महासचिव मुनिलाल यादव यांनी उमेदवारीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरी करुन अपक्ष अर्ज दाखल केला. मंगळवारी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत समाहरणालय येथे जावून अर्ज भरला.

या मतदारसंघात एकामागोमाग एक घडामोडी घडत आहेत. मुनिलाल यादव यांच्या उमेदवारीच्याही अगोदर एनडीएमध्ये सहभागी झालेल्या लोजपाचे नेते अरुण कुमार यांनी पक्षाला रामराम ठोकून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे.

 Lalu Prasad Yadav
माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

अरुण कुमार यांनी दावा केला की, जहानाबादमध्ये त्यांची लढत कुणाशीही नाही. इथले एक उमेदवार आणि विद्यमान खासदार अॅम्ब्युलन्स घोटाळ्यात सहभागी असलेले आहेत. दुसरे माजी खासदार महाआघाडीचे उमेदवार हे संसदेत महिला बिल फाडणारे आहेत... असा प्रचार अरुण कुमार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com