Buldhana Lok Sabha Election : 25 वर्षाची सत्ता कायम राहणार की सेनेला पक्षफुटीचा फटका बसणार?

Buldhana Lok Sabha Election : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची झालेली शकले, भाजपची सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी व विद्यमान केंद्र शासना विरोधात महागाई व व्यापारी धार्जिने धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली जाणार आहे.
Buldhana Lok Sabha Election
Buldhana Lok Sabha Electionesakal
Updated on

अरुण जैन, सकाळ वृत्तसेवा

आधी वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड, अशी म्हण प्रतलित होती. बुलढाणा जिल्ह्याला देखील ही म्हण लागू होती. जिल्ह्यातील शेतकरी प्रगतशील होता. इंग्रजांनी तर येथील उत्तम दर्जाच्या कपाशीला त्यांच्या देशापर्यंत पोहचलं होतं. खामगाव व देऊळगाव राजा ही तेव्हा पांढऱ्या सोन्याची मोठी उलाढाल करणारी केंद्रे होती. ब्रिटिशांनी त्यांच्या परीने या जिल्ह्याचा विकास केला. या शहराचे पूर्वीचे नाव 'भिलठाणा' असे होते.  इंग्रज काळात 'बुलढाणा' असे नामांतर करण्यात आले.

1867 मध्ये बुलढाणा जिल्हा घोषित झाला. मध्य प्रांत व नागपूर करारानंतर महाराष्ट्रात हा जिल्हा समाविष्ट झाल्यावर राज्यकर्त्यांनी जिल्ह्याची अक्षम्य उपेक्षा केली. यामुळे जिल्ह्याचे मागासलेपण, विकासाचा अनुशेष कायम आहे. हा अनुशेष भरण्याची संधी मतदारांना आणि राज्यकर्त्यांना देखील आहे. त्यामुळे बुलढाण्यातली राजकीय समिकरण समजून घेणे गरजेचे आहे, नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ....

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची झालेली शकले, भाजपची सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी व विद्यमान केंद्र शासना विरोधात महागाई व व्यापारी धार्जिने धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली जाणार आहे. अँटी इन्कम्बंसी च्या नावाखाली यावेळी उमेदवारांची संख्या देखील वाढणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात शेवटपर्यंत चुरशीचा सामना पहावा लागू शकतो.

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या व येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये सर्वच बाबतीत मोठी तफावत राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्यामध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद असे सात मतदारसंघ विधानसभेचे आहेत. यापैकी मलकापूर मतदारसंघ हा नजीकच्या रावेर लोकसभा मतदारसंघाशी जोडला गेलेला. जिल्ह्यात फारशी औद्योगिक क्रांती झालेली नसल्याने बहुतांश शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग आहे. गेल्या 1996 पासून अर्थात 25 वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार जनतेने निवडून दिलेला आहे.  

1996, 1999 व 2004 असे तीन वेळा आनंदराव अडसूळ व 2009, 2014 व 2019 असे तीन वेळा प्रतापराव जाधव यांना खासदारकीचा मान मिळाला आहे. 2009 चा अपवाद वगळता खासदार प्रतापराव जाधव यांना 2014 व 2019 मध्ये मोदी लाटेचा लाभ झाल्याचे बोलले जाते. प्रामुख्याने मलकापूर खामगाव, जळगाव जामोद व मेहकर या विधानसभा क्षेत्रांमध्ये हिंदुत्ववादी मतदारांची संख्या जास्त आहे. चिखली व बुलडाणा मध्ये आलटून पालटून काँग्रेस व हिंदुत्ववादी भाजपा शिवसेनेला मतदारांनी पसंती दर्शविलेली आहे. सिंदखेड राजा मतदार संघात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा वैयक्तिक अंमल आहे मग ते कोणत्याही पक्षात असोत.

सामाजिक समीकरण-

बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कुणबी, मराठा, माळी, वंजारी, लेवा पाटील व मुस्लिम, जैन, शेख अल्पसंख्यांक तसेच आदिवासी समाज आहे. सर्वाधिक हिंदू समाजाची टक्केवारी 71.35% तर मुस्लिम समाज 13.7 टक्के एवढा आहे. हिंदूंमध्ये प्रामुख्याने मराठा, कुणबी, पाटील, माळी, देशमुख वंजारी लेवा पाटील धनगर, चांभार, सुतार, लोहार आदी समाज घटकांचा समावेश होतो. त्यामुळेच अलीकडच्या 25 वर्षांमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचा उमेदवार निवडून आलेला आहे.

2004 पर्यंत हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मतदारसंघ खुला झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव गेल्या पंधरा वर्षांपासून विजयी होत आहेत. परंतु ज्या ज्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दलित मुस्लिम आदी मतदान एकत्र होते त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे.

या मतांमध्ये विभाजन करण्यात भाजप शिवसेना युती सफल ठरते आणि आपला उमेदवार निवडून आणते. गेल्या 2019 च्या निवडणुकीतही निवड दलित व मुस्लिम बहुतांश मतदान हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाले. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पडला हे नाकारून चालणार नाही.  मात्र 2024 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आदी सर्वांनी एकत्र आल्यास निकालावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव निवडून आल्यामुळे त्याचा परिणाम सहाजिकच जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांवर झाला. त्याला वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या प्रमाणावर  कारणीभूत ठरली. बुलडाणा, चिखली, खामगाव, येथील आघाडीच्या जागा केवळ वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने गमावाव्या लागल्या.भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात खामगाव जळगाव जामोद आणि चिखली तर शिवसेनेच्या ताब्यात मेहकर आणि बुलडाणा असे सात पैकी पाच मतदारसंघ आले तर आघाडीला केवळ सिंदखेड राजा आणि मलकापूर दोन ठिकाणी सत्ता राखता आली.

सद्यस्थितीत केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या सरकार बद्दल फारसे मत जनतेमध्ये चांगले नाही. महागाई, बेरोजगारी, दिलेली आश्वासने न पाळणे, नोटाबंदी आदी सारख्या समस्यांनी जनता त्रस्त आहे. सत्ताधार्‍यांच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तोडाफोडीच्या राजकारणालाही जनता कंटाळली आहे. मात्र दुसरीकडे सक्षम विरोधी पक्षही नाही त्यामुळे मतदार काय करावे काय नको? या घालमेलीमध्ये दिसत आहे.

Buldhana Lok Sabha Election
Sangli Loksabha : जयंतराव, विश्‍वजित यांची संजय पाटलांसमवेत 'सेटलमेंट'; भाजपच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप

इच्छुकांची संख्या वाढली-

2024 लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे लोकसभेच्या रिंगणात राहतीलच तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ इच्छुक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांनीही खासदार होण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या गटातील माजी आमदार रेखाताई खेडेकर यांना देखील लोकसभेची निवडणूक लढवायची आहे.

डॉ राजेंद्र शिंगणे हे स्वतःहून निवडणूक लढविण्याचे बोलत नसले तरी त्यांचे समर्थक मात्र बुलडाण्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री दिल्यामुळे शिंगणेंच्या लोकसभेच्या दृष्टीने ही तयारी असल्याचे बोलतात. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वतंत्र चूल मांडणारे रविकांत तुपकर हे देखील लोकसभेची तयारी करीत आहेत. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला व जनमत आजमावून पहायलासुरुवात केली आहे तर दुसरीकडे राजर्षी शाहू परिवाराचे संदीप दादा शेळके हे वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विकासाच्या व नियोजनाच्या नावावर ते आपला लेखाजोखा मतदारांसमोर मांडत आहेत.

मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कुणाची कुणासोबत युती आणि कोणासोबत आघाडी होते, हे अद्याप ठरलेले नसले तरी प्रत्येकाने आपापल्या परीने तयारी व लढण्याची इच्छा बोलून दाखविलेली आहे.

२०१९ निकाल-

प्रतापराव जाधव-  ५२१९७७ (शिवसेना)
डॉ राजेंद्र शिंगणे- ३८८६९० (राष्ट्रवादी)
बळीराम सिरस्कार - १७२६२७
नोटा - ७६८१

विधानसभा मतदारसंघ निहाय निवडून आलेले  उमेदावर-

बुलडाणा:
संजय रामभाऊ गायकवाड शिवसेना - ६७७८५ (३७.८३%)
विजय हरिभाऊ शिंदे वंचित बहुजन आघाडी- ४१७१० (२३.२८%)
हर्षवर्धन वसंतराव सपकाळ काँग्रेस - ३१३१६ (१७.४८)

मेहकर:

डॉ. संजय रायमुलकर शिवसेना - ११२०३८ (६४.९ %)
अनंत सखाराम ४९८३४ (२८.५१ %)

जळगाव जामोद :

डॉ. संजय कुटे भाजप - १२७३५ (५०.४३%)
स्वाती संदीप वाकेकर काँग्रेस - ६७५०४ { ३३.१३}
संगीतराव भास्करराव भोंगळ वंचित बहुजन आघाडी- २९९८५ (१४.७२)


खामगाव:
आकाश पांडुरंग फुंडकर भाजप - ९०७५७ (४५.८०)
ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गणेश काँग्रेस - ७३७८९ (३७.२४%)
शरद वसतकार वंचित बहुजन आघाडी - २५९५७ (१३.१०)

सिंदखेड राजा:

डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे राष्ट्रवादी - ८१७०१ (४०.५८)
डॉ. शशिकांत खेडेकर शिवसेना- ७२७६३ (३६.१४%)
सविता शिवाजी मुंढे - वंचित बहुजन आघाडी - ३९८७५ (१९.८१%)

चिखली:

श्वेता महाले भाजप - ९३५१५ (४८.१६)
राहुल सिद्धिविनायक बोंद्रे कॉंग्रेस - ८६७०५(४४.६५)
अशोक सुरडकर वंचित बहुजन आघाडी - ९६६६१. (४.९८)

Buldhana Lok Sabha Election
Pankaja Munde: "धनंजय मुंडेंचं योगदान ..."; लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com