Chandrapur Exit Poll: सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार? एक्झिट पोल सांगतोय धक्कादायक अंदाज

शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत.
in country india urban naxalism danger sudhir mungantiwar pune marathi news
in country india urban naxalism danger sudhir mungantiwar pune marathi newssakal

मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत झाली होती. यामध्ये टीव्ही ९-पोलस्ट्रार या एक्झिट पोलनुसार धानोरकर या आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे तर सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत. त्यामुळं खरंतर विविध राजकीय विश्लेषकांनी केलेल्या भाकितांनुसार एक्झिट पोलचा हा अंदाज अपेक्षित असल्याचं दिसत आहे. (Chandrapur Exit Poll what will happen to Sudhir Mungantiwar Exit polls are making shocking predictions)

in country india urban naxalism danger sudhir mungantiwar pune marathi news
Beed Exit Poll: पंकजा मुंडे जिंकणार की बजरंग सोनवणे? बीडचा एक्झिट पोल आला समोर

चंद्रपूरमधील लढत खरंतर खूपच रंजक झाली आहे. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ही एकमेव अशी जागा होती जिथं काँग्रेसला यश मिळालं होतं. या ठिकाणी प्रतिभा धानोरकर यांचे पती दिवंगत सुरेश धानोरकर हे निवडून आले होते. पण त्यांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसनं त्यांच्या पत्नीला अर्थात प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्या जिंकून येतील असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

in country india urban naxalism danger sudhir mungantiwar pune marathi news
Congress Exit Poll: काँग्रेस अध्यक्षांनी सांगितला 'एक्झिट पोल'; इंडिया आघाडीला मिळणार 'इतक्या' जागा

तर दुसरीकडं या ठिकाणाहून भाजपला उमेदवार मिळत नसल्यानं त्यांनी राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवार दिली. पण यासाठी मुनगंटीवारांची इच्छा नव्हती असंही सांगितलं जात होतं. पण पक्षानं आदेश दिल्यानं त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय नव्हता, असंही सांगितलं गेलं आहे.

in country india urban naxalism danger sudhir mungantiwar pune marathi news
Congress: ​चोवीस तासाच्या आत काँग्रेसचा यु-टर्न; INDIA आघाडीच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय

त्यामुळं आता एक्झिट पोलमधून जो अंदाज समोर आला आहे, त्यानुसार जी भाकितं यापूर्वी वर्तवली गेली होती त्या अपेक्षेनुसार या ठिकाणी धानोरकर हे विजयापर्यंत पोहोचतील असं सांगितलं गेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com