Chikkodi Lok Sabha : मतदारसंघातील 650 हून अधिक गावांत प्रचार केल्यानंतर जोल्ले, जारकीहोळी झाले 'रिलॅक्स'

चिक्कोडी मतदारसंघात तब्बल महिना प्रचार केल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी मंगळवारी संपली.
Chikkodi Lok Sabha
Chikkodi Lok Sabhaesakal
Summary

निवडणूक संपल्याने मंत्री सतीश जारकीहोळी निवांत मूडमध्ये दिसून आले. आपल्या कुटुंबातील सदस्य तेही मुलगी प्रियंका यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविल्याने सर्व धुरा मंत्री जारकीहोळी सांभाळत होते.

Chikkodi Lok Sabha : गेल्या काही दिवसांपासून उन्हाबरोबर प्रचाराचेही रान पेटले होते. सकाळी लवकर ते रात्री उशिरापर्यंत नेते पायाला भिंगरी बांधून फिरत होते. संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसह ते चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील साडेसहाशे हून अधिक गावांत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक नेत्यांच्या हाकेला ओ देत त्यांना फिरावे लागले. मंगळवारी मतदान झाल्यानंतर सर्व नेते रिलॅक्स झाले. भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांचे कुटुंबीय आणि तसेच सतीश जारकीहोळी आणि उमेदवार मुलगी व मुलगा हेही रिलॅक्स झाले.

जोल्ले कुटुंबीय निवांत मूडमध्ये

चिक्कोडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी मतदारसंघात तब्बल महिना प्रचार केल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी मंगळवारी संपली. त्यानंतर भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी निवांतपणा अनुभवला. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होत राहिल्या तरी बऱ्याच दिवसांपासून निवांतपणा त्यांनी आज घेतला.

Chikkodi Lok Sabha
18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!
Chikkodi Lok Sabha Shashikala Jolle
Chikkodi Lok Sabha Shashikala Jolle

आमदार शशिकला जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, यशस्विनी जोल्ले, प्रीया जोल्ले यांनी चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथील फुलबागेत शांततापूर्ण वातावरणात थोडा वेळ विश्रांती घेतली. खासदार अण्णासाहेब जोल्ले तात्काळ कामासाठी दिल्लीला गेले होते. आपल्या बागेतील विविध प्रकारची झाडांचे निरीक्षण करताना स्वच्छ वातावरणात फिरताना त्यांनी मतदारसंघाचा आढावाही घेतला. बऱ्याच दिवसानंतर शांतता जाणवत असल्याचे आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, थोडा वेळ बसून कुटुंबासमवेत निवांतपणा अनुभवला.

Chikkodi Lok Sabha
Sangli Lok Sabha : संजय पाटील, विशाल पाटील यांच्यातच रस्सीखेच; विलासराव ठरणार 'किंगमेकर'?

जारकीहोळी नेहमीच्या ‘कुल’ वातावरणात

निवडणूक संपल्याने मंत्री सतीश जारकीहोळी निवांत मूडमध्ये दिसून आले. आपल्या कुटुंबातील सदस्य तेही मुलगी प्रियंका यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविल्याने सर्व धुरा मंत्री जारकीहोळी सांभाळत होते. एरव्हीही शांत असलेले जारकीहोळी प्रचारातही दौरे अधिक आणि भेटी अधिक या तत्त्वावर ते फिरत राहिले. मंगळवारी मतदान झाल्यानंतर त्यांनी निवांतपणा अनुभवला.

मंत्री जारकीहोळी यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह गोकाक शहरातील शेट्टी स्वीट मार्ट स्टोअरमध्ये जाऊन काही वेळ बसून मनसोक्त गप्पा मारल्या. मुलीसाठी त्यांनी आठ विधानसभा मतदारसंघात पायाला भिंगरी बांधली. आता ते रिलॅक्स मुडमध्ये दिसून आले. त्यांच्यासोबत उमेदवार प्रियंका व मुलगा राहुल हेही प्रचाराची धुरा सांभाळले होते. आज सर्वजण निवांतपणा अनुभवले. निवडणुकीनंतर नेहमीप्रमाणे ते आपल्या सहकाऱ्यांसह दुकानात बसून आढावा घेत निवांतपणा मोकळीक अनुभवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com