18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

कारवारमधील दोन आमदारांपैकी एक कॉँग्रेस व एक भाजपचे आहेत.
Belgaum Lok Sabha Elections
Belgaum Lok Sabha Electionsesakal
Summary

बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदारांना या निवडणुकीत विधानसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावीच लागणार आहे.

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या (Belgaum Lok Sabha Elections) निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील १८ आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करताना यावेळी त्यांची दमछाक झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली तेवढी मते यावेळी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ आमदारांपैकी पाच, तर चिक्कोडी मतदारसंघातही आठपैकी पाच काँग्रेस आमदार (Congress MLA) आहेत. कारवारमधील दोन आमदारांपैकी एक कॉँग्रेस व एक भाजपचे आहेत. मंगळवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर या आमदारांनी व त्यांच्या समर्थकांनी आकडेमोड सुरू केली आहे. आमदारांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

Belgaum Lok Sabha Elections
रत्नागिरी-सिंधुदुर्गात 64 टक्के मतदान; 'या' 9 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद, कोण मारणार बाजी?

बेळगाव लोकसभा मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar), राजू सेठ, महांतेश कौजलगी, विश्‍वास वैद्य व अशोक पट्टण हे पाच काँग्रेस आमदार आहेत. तर अभय पाटील, रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी हे तीन भाजपचे आमदार आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत. पक्षाने त्यांचे सुपुत्र मृणाल यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मृणाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून हेब्बाळकर या पायाला भिंगरी लावून प्रचार करीत आहेत. त्यांना उर्वरित चारही आमदारांची साथ मिळाली आहे.

पण, त्या आमदारांच्या मतदारसंघातील मतदारांची साथ मिळणार का? हा प्रश्‍न आहे. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांची भिस्त तीन आमदारांवर आहे. यापैकी भालचंद्र व रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) मतदारसंघातच आहेत, शिवाय त्यांनी शेट्टर यांचा जोरदार प्रचारही केला आहे. अभय पाटील यांच्याकडे पक्षाने तेलंगणची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे त्यांना प्रचारात फारसा सहभाग घेता आलेला नाही, पण या तीन आमदारांकडून किती मताधिक्य दिले जाणार? याकडे जाणकारांचे लक्ष आहे.

Belgaum Lok Sabha Elections
Belgaum Lok Sabha : बेळगावात 72 टक्के, तर चिक्कोडीत विक्रमी 78.63 टक्के मतदान; वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार?

चिक्कोडी मतदारसंघात सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi), लक्ष्मण सवदी, राजू कागे, गणेश हुक्केरी व महेंद्र तम्मन्नावर हे पाच काँग्रेस आमदार आहेत. तर शशिकला जोल्ले (Shashikala Jolle), दुर्योधन ऐहोळे व निखिल कत्ती हे तीन भाजप आमदार आहेत. यापैकी बांधकाम खात्याचे मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून जारकीहोळी चिक्कोडीत ठाण मांडून आहेत.

उर्वरित चार आमदारही प्रचारात सक्रीय आहेत, पण अथणीचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावर जारकीहोळी यांची मोठी भिस्त आहे. भाजपच्या आमदार जोल्ले यांचे पती व विद्यमान खासदार आण्णासाहेब जोल्ले हे भाजपचे उमेदवार आहेत. निखिल कत्ती व दुर्योधन ऐहोळी या दोन आमदारांवर जोल्ले यांची भिस्त आहे. काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात मताधिक्य मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, तो प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार, हे निकालानंतरच कळणार आहे.

Belgaum Lok Sabha Elections
Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

८० टक्के मतांचे उद्दिष्ट

बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदारांना या निवडणुकीत विधानसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावीच लागणार आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या ८० टक्के मते यावेळी पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराला मिळवून द्यावयाची आहेत, तशी सूचनाच त्याना वरिष्ठांकडून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com