Pune Loksabha Congress : काँग्रेसवर ‘हाता’ने अपयशाची वेळ

कसब्याच्या पोटनिवडणुकीनंतर एकेकाळी बालेकिल्ला असलेला पुणे शहर लोकसभा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात काँग्रेसला अपयश आले.
Pune Loksabha Congress
Pune Loksabha Congresssakal

कसब्याच्या पोटनिवडणुकीनंतर एकेकाळी बालेकिल्ला असलेला पुणे शहर लोकसभा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात काँग्रेसला अपयश आले. महाविकास आघाडीला राज्यात सहानुभूतीची लाट असताना अंतर्गत मतभेद आणि विस्कळित यंत्रणेचा फटका काँग्रेसला बसला. परंतु गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत आत्मविश्‍वास गमाविलेल्या काँग्रेसला रवींद्र धंगेकर यांच्या निमित्ताने शहरातील मतांचा टक्का वाढविण्यात मात्र यश आले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून पुणे शहर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. २०१४पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर मात्र आत्मविश्‍वास गमाविलेल्या काँग्रेसला एक वर्षापूर्वी कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काही प्रमाणात ऊर्जा मिळाली. तोच पॅटर्न लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा शहरात उतरविण्यात पक्षाला यश आले नाही. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासारखा नेता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्षाची साथ असूनही काँग्रेसला यशाचे शिखर गाठणे शक्य झाले नाही. प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळूनही संधीचे सोने करणे शक्य झाले नाही. कार्यकर्ते झटले; परंतु नेते मागे राहिल्याने पक्षावर ही परिस्थिती आली.

महागाई, बेरोजगारी, संविधान, मराठा आरक्षण आदी मुद्यांवरून राज्यात रान उठले असतानाही पुण्यासारख्या शहरात त्याचा फायदा काँग्रेसला उठविता आला नाही. अंतर्गत मतभेदामुळे अखेरच्या टप्प्यापर्यंत पक्ष यंत्रणा पूर्ण क्षमतेने प्रचारात उतरली नाही. धंगेकर यांनीही पक्षापेक्षा वैयक्तिक प्रचारावर भर दिल्याने त्याचा फटका बसला. एवढेच नव्हे, तर वर्षभरापूर्वी ज्या मतदारसंघातून विजय मिळविला. त्या मतदारसंघातही मताधिक्य मिळविणे अवघड झाले. शहरातील पक्षाच्या मतांचा टक्का वाढला, परंतु त्यांचे विजयात रूपांतर करण्यात पक्षाला यश आले नाही. दोन लोकसभा निवडणुकीत जेमतेम काँग्रेस उमेदवाराला तीन लाख मते मिळाली. त्यात जवळपास दीड लाखाने वाढ झाली. पक्षाने साडेचार लाखांहून अधिक मतांचा टप्पा पहिल्यांदा गाठला. ही जमेची बाजू सोडता पक्षावर पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com