Sangli Loksabha : 'शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल'; विश्‍वजित कदमांचा थेट इशारा

स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला राहिला आहे. तो आम्ही लढवणारच आहोत.
Sangli Loksabha
Sangli Loksabhaesakal
Summary

'अवघ्या सहा-सात दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांची उमेदवार कशी जाहीर करता? शिवसेनेची मागणी चुकीची आहे.'

सांगली, मुंबई : स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला राहिला आहे. तो आम्ही लढवणारच आहोत. शिवसेनेने (Shiv Sena) हट्ट सोडावा. अन्यथा, आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील उपस्थित होते. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून परस्पर सांगलीबाबत घोषणा केल्या जात असल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत डॉ. कदम म्हणाले, ‘सांगलीने देशाला, राज्याला दूरदृष्टीचे नेतृत्व दिले. काँग्रेसच्या विचारातून ते घडले. हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा ही लोकांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

Sangli Loksabha
Kolhapur Loksabha : 'शरद पवार गटाचे बडे नेते लवकरच भाजपमध्ये येणार'; महाडिकांच्या दाव्याने पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ

महाविकास आघाडी जातीयवादी शक्तींना रोखायला एकत्र लढत आहे, त्याचा आनंद आहे. पण, सांगलीच्या जागेवर इतर घटक पक्षांनी अधिकार सांगण्याचे कारण नाही. सांगली काँग्रेसकडेच राहणार आहे. तशी आग्रही मागणी एकदिलाने, एक विचाराने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.’

ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीत कोणत्या जागेच्या बदल्यात काय करावे, हा ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्‍न आहे. आम्ही सांगली सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत, चांगले पैलवान आहेत; परंतु राजकारण, समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागते. सातत्याने लोकांत संपर्क ठेवून प्रश्‍न सोडवावे लागतात. सांगलीत दुष्काळ, पाण्याचा प्रश्न महत्त्‍वाचा आहे.

Sangli Loksabha
Kolhapur Loksabha : 'झालं गेलं विसरून लोकसभेला सहकार्य करा'; खासदार मंडलिकांचं केपींना भावनिक आवाहन

काँग्रेस नेत्यांनी त्याबाबत सातत्याने भूमिका घेतली. अशावेळी अवघ्या सहा-सात दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांची उमेदवार कशी जाहीर करता? शिवसेनेची मागणी चुकीची आहे. त्यांनी हट्ट धरू नये. जिल्ह्यात ६०० गावे आहेत. शिवसेना नेतृत्वाने सांगावे, १० टक्के ठिकाणी तरी शिवसेनेचे सरपंच आहेत का? काँग्रेसचे जिल्हा परिषद, पंचायत समितीत कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत.’

राऊत यांच्याबद्दल नाराजी

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, ‘खासदार संजय राऊत हे शिवसेना नेते आहेत. महाविकास आघाडीची भूमिका ते व्यक्तीगत सांगू शकत नाहीत. ते शिवसेनेबाबत बोलू शकतात. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यांच्यावतीने अधिकृत वक्तव्य झाले पाहिजे. कोणत्याही पक्षाने व्यक्तीगत टिप्पणी करू नये. सांगली लढण्यास व जिंकण्यास काँग्रेस सक्षम आहे. सांगलीबाबत आमचा निर्णय झाला आहे. आम्ही जागा लढतोय. तसे राष्ट्रीय व प्रदेश नेत्यांना सांगितले आहे. राज्याचे नेतृत्व आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सांगलीच्या लोकभावना जोपासण्यासाठी जागा काँग्रेसकडे राहील, असा विश्‍वास त्यांनी दिला आहे.’

Sangli Loksabha
उदयनराजेंच्या उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट; महाजनांनी सुरुचीवर घेतली शिवेंद्रराजेंची भेट, दोन्ही नेत्यांत बंद दाराआड चर्चा

सांगलीचा तिढा सुटलेला आहे. येथे काँग्रेसच लढणार आहे. आमचे उमेदवार विशाल पाटील असतील. त्यांना तयारीचे आदेश आम्ही दिलेले आहेत. त्याबद्दलचे इतर काही विषय असतील ते महाविकास आघाडीच्या चर्चेत संपून जातील.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com