Madha Lok Sabha Election Results : मोहितेंचा राग अन् शरद पवारांचा बदला; माढ्यात कसं बदललं चित्र?

शरद पवार (Sharad Pawar) इतके धुरंदर राजकारणी आहेत की त्यांनी भाजपचा त्यांच्याच शास्त्राने पराभव केलाय.
Madha Lok Sabha Election Results
Madha Lok Sabha Election Resultsesakal
Summary

२०१४ साली मोदीलाटे तही विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. पण, २०१९ साली सगळीच गणितं बदलली. मोहितेंनी रणजीत मोहिते पाटलांसाठी माढ्याची मागणी केली आणि पवारांनी ती नाकारली.

-नेहा सराफ

Madha Lok Sabha Election Results : शरद पवार (Sharad Pawar) इतके धुरंदर राजकारणी आहेत की त्यांनी भाजपचा त्यांच्याच शास्त्राने पराभव केलाय. माढ्याची निवडणूक पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण शिकवणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुख्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून हिसकावला म्हणणाऱ्या भाजपला अजून बरेच डावपेच शिकणे बाकी आहे हेच यातून दिसून येतं.

तर, गोष्ट सुरु होते २००९ पासून. माढा लोकसभा अस्तित्वात आल्यावर पाहिल्यांदा स्वतः पवार निवडून आले. अर्थात त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मोहितेंची होती आणि ती त्यांनी पारही पाडली. पण, त्यानंतर पवारांनी जिल्ह्यात घातलेलं लक्ष त्यांना त्रासदायक ठरायला लागलं पण बोलणार कोणाला? त्यांचाच पक्ष आणि त्यांचेच नेते त्यामुळे त्यांनी कशीबशी पाच वर्ष काढली.

Madha Lok Sabha Election Results
Bengaluru South Election Results : बंगळुरू दक्षिणमधून भाजपच्या तेजस्वी सूर्यांनी घेतली मोठी आघाडी; काँग्रेसच्या सौम्या रेड्डी पिछाडीवर

पुढे २०१४ साली मोदीलाटे तही विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. पण, २०१९ साली सगळीच गणितं बदलली. मोहितेंनी रणजीत मोहिते पाटलांसाठी माढ्याची मागणी केली आणि पवारांनी ती नाकारली. भाजपची तेव्हा असलेली हवा आणि पवारांनी केलेला अपमान यामुळे दुखावलेले मोहिते थेट भाजपमध्ये गेले.

भाजपमध्ये मात्र त्यांना कुठलीही जागा लढायला मिळाली नाही. उलट पक्षादेशाप्रमाणे राखीव जागेमुळे बाहेरून आलेले राम सातपुते त्यांनी निवडून आणले. खासदारकीचीही तीच गत. तिथेही सातारच्या रणजितसिंह निंबाळकर यांना मदत करावी लागली. त्या बदल्यात रणजितसिंह मोहिते पाटलांना विधानपरिषदेचं चॉकलेट देण्यात आलं. पण काही वर्षांतच निंबाळकर आणि सातपुते या दोघांचा मोहितेंशी खटका उडाला आणि मोहितेंच्याही राजकीय महत्वाकांक्षा जाग्या झाल्या.

इकडे माढ्यात प्रत्येक कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगायला लागलं. दुसरीकडे २०२४च्या लोकसभेत आम्हालाच तिकीट हवं असा हट्ट मोहितेंनी पक्षाकडे धरला. पण, भाजपने मात्र विद्यमान खासदार म्हणून निंबळकरांचं नाव निश्चित केलं आणि इकडे पवारांनी वेगळीच खेळी खेळली.

Madha Lok Sabha Election Results
Thoothukudi Lok Sabha Election Results : DMK च्या कनिमोझींनी थुथुक्कुडी मतदारसंघातून 3,50,390 मतांच्या फरकाने आघाडीवर

असाही त्यांच्याकडे माढ्यात तगडा उमेदवार नव्हताच. मोहितेही नाराज होतेच. मग काय पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत आणले आणि तिकीट दिले. मोहिते पाटलांनी माढा तर जिंकलंच पण तिकडे सोलापूरमध्येही प्रणिती शिंदेंना बळ दिलं. दुसरीकडे त्यांच्या साखर कारखान्याचे बरेच सभासद हे बावडा तालुका इंदापूरमध्ये आहेत. त्याचा फायदा थेट सुळेंना झाला. त्यामुळे पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले यात शंका नाही. ज्या मोहितेंच्या जीवावर भाजपने त्यांच्याकडून २०१९ साली माढा ओढलं त्याच मोहितेंची घरवापसी करत पवारांनी पराभवाचे उट्टे काढले यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com