Farmer leaders : निवडणुकीत सत्ताधारी गटाला जेरीस आणणाऱ्या प्रमुख शेतकरी नेत्यांची तोंडे चार दिशेला

ही सर्व नेतेमंडळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
Farmer leaders
Farmer leadersesakal
Summary

शेट्टी-खोत या जोडगोळीने राज्यभर सभांना उच्चांकी गर्दी खेचली आणि ऊसदर आंदोलनात सरकारला गुडघे टेकायला लावले.

नवेखेड : एकेकाळी शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान उठवून प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी गटाला जेरीस आणणाऱ्या प्रमुख शेतकरी नेत्यांची तोंडे या निवडणुकीत चार दिशेला झालीत. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti), माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील, ‘बळिराजा’चे संस्थापक बी. जी. पाटील नेते आहेत. ही सर्व नेतेमंडळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलने केलीत. ते एकत्रित लढावेत, अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा; मात्र ती सत्यात उतरणे सध्या तरी कठीण आहे.

Farmer leaders
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे काँग्रेस सावध; विश्‍वजित, पृथ्वीराज, सावंतांना नागपूरला पाचारण

कधी काळी एकत्र असणाऱ्यांनी एकत्रितरीत्या लढताना सत्ताधारी गटाला जेरीस आणले. उसाची वाहने अडविणे, ऊसतोड बंद पाडणे, कारखान्यांची शेती कार्यालये जाळणे, कारखाने बंद पाडणे असे अनेक फंडे वापरून त्यांनी शेतकऱ्यांना हक्कांविषयी जागृत केले. मात्र या नेत्यांनी (Farmer leaders) लोकसभा निवडणुकीत सवतासुभा मांडला आहे.

सर्वांना शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्यांची नेहमी पसंती राहिली. मात्र प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा वेगळी असल्याने हे नेते काही काळ वगळता एकत्र राहिले नाहीत, हे वास्तव. शेतमालाला योग्य दर मिळावा, यासाठी त्यांनी लढे उभारले. ऊसदराच्या आंदोलनात साखर कारखानदार कसे लुबाडतात, त्यांना अधिकचा दर कसा देता येतो, हे आकडेवारीनिशी पटवून देण्यात ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांचा हातखंडा. सरकारवर थेट आरोप करीत ते सत्ताधारी पक्षाला घायाळ करीत. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत या जोडीने त्यांच्यासमवेत काम केले.

पुढे, हे दोघेही रघुनाथ पाटील यांच्यापासून बाजूला गेले. श्री. पाटील यांनी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, शिवसेना, बीआरएस असे पक्ष निवडले. मात्र शेतकऱ्यांचा लढा हे सूत्र कायम जपले. यंदाच्या निवडणुकीत हातकणंगले मतदार संघामधून लढण्यासाठी ते इच्छुक आहेत. स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी यांचा उसदराचा लढा संपूर्ण राज्यभर गाजला. शेट्टी-खोत या जोडगोळीने राज्यभर सभांना उच्चांकी गर्दी खेचली आणि ऊसदर आंदोलनात सरकारला गुडघे टेकायला लावले. उसाला चांगला दर मिळावा, यासाठी आग्रही राहिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून ते खासदार झाले.

Farmer leaders
Hatkanangale Lok Sabha : ..अखेर आमदार प्रकाश आवाडेंची तलवार म्यान; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मानेंना जाहीर केला पाठिंबा

मात्र २०१९ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. चुका मान्य करीत त्यांनी या मतदार संघात ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेतली. अन्य पक्षाचे उमेदवार ठरण्याआधीच त्यांनी सभा व भेटीगाठी सुरू केल्या आहेत. माढा मतदारसंघात सदाभाऊंचा निसटता पराभव झाला. यावरून संघटनेची लोकप्रियता त्या भागातही होती, हे लक्षात येते. शेट्टी, खोत, बी. जी. पाटील एकत्र काम करीत होते. भाजपकडून विधान परिषदेची आमदारकी सदाभाऊंना मिळाली, ते मंत्री झाले. काही काळ चांगला गेला. नंतर दोघांत दरी वाढली आणि या शेतकरी नेत्यांची जोडगोळी फुटली. सदाभाऊंनी रयत क्रांती संघटना काढली. ते बाजूला गेले. त्यानंतरही शेट्टी व खोत यांचे आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले. देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू बनले.

Farmer leaders
'तुमच्यात चमत्कार करण्याची क्षमता, त्यामुळं तुमची ताकद महायुतीच्या मागं लावा'; मुख्यमंत्र्यांचे महाडिकांना आवाहन

‘हातकणंगले’मधून उमेदवारी मिळावी, अशी मागणी खोत यांनी केली होती. त्याचवेळी शेट्टी व खोत यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे सदाभाऊ खोत यांच्यासमवेत सभा गाजवणारे, शड्डू मारून भाषण करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांची आठवण करून देणारे त्यांचे दुसरे सहकारी बी. जी. पाटील यांनीही त्यांच्याशी न पटल्याने या दोघांपासून फारकत घेतली. बळिराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि शेतकरी, सामान्यांसाठीची लढाई सुरू ठेवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com