Loksabha Election 2024 : दिव्यांग मतदारांसाठी पाच हजार स्वयंसेवक ;समाजकल्याण अधिकारी कोरगंटीवार यांची माहिती

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग मतदारांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच हजार ११८ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग मतदारांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच हजार ११८ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. दिव्यांगांना सुरक्षितपणे मतदान केंद्रात पोहोचविण्यासाठी हे स्वयंसेवक मदत करणार आहेत.

यासाठी मतदान केंद्रांवर तीन हजार ३५३ व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती लोकसभा निवडणूक दिव्यांग कक्षाचे समन्वयक आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी गुरुवारी दिली. पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांत दिव्यांगांना सुलभतेने मतदान करता यावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने पुरविलेल्या सुविधांची माहिती देण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

त्यावेळी कोरगंटीवार बोलत होते. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध सुविधांची माहिती दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या सर्व संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी प्रहार अपंग संघटनेने केली होती. या मागणीवरून पुणे जिल्हा परिषदेत बैठक झाली.

Loksabha Election 2024
Loksabha 2024: पालघरमधून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात

यावेळी जिल्हा समाजकल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ, निमवैद्यकीय अधिकारी किरण बोडके, सुदेशना राव, पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागाचे अधिकारी रामदास चव्हाण, भावना मोहोड आदी उपस्थित होते. दिव्यांगांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

दृष्टिक्षेपात जिल्हा

  • दिव्यांग मतदार : ७५ हजार ३९

  • मतदान केंद्रे : आठ हजार ३८२

  • मतदान केंद्रांवरील व्हीलचेअर : ३ हजार ३५७

  • स्वयंसेवक : पाच हजार ११८

मतदारांच्या मागण्या

  • निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सक्षम ॲपद्वारे मागणी केलेल्या मतदारांना सुविधा

  • दिव्यांगांसाठी इमारतींच्या तळमजल्यावर मतदान केंद्र

  • रॅम्प, व्हीलचेअरची सोय

  • दिव्यांगांची स्वतंत्र रांग

  • दिशादर्शक फलक, पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, पार्किंगची सोय

  • स्वयंसेवक, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष

  • अंशतः अंध दिव्यांगांसाठी भिंगाच्या काचा, ब्रेल लिपीतील साहित्य

  • कर्णबधिर दिव्यांगांसाठी साइन लॅंग्वेज दुभाषा

  • ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com