Gadchiroli Chimur Loksabha Constituency : लढत कमळविरुद्ध पंजातच

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात अनेक खलबते आणि खटपटी केल्यानंतर महायुती व महाआघाडीने अखेरच्या दोन दिवसांत आपले उमेदवार जाहीर केले. एरवी उमेदवार जाहीर करण्यात नेहमीच पुढे असलेल्या भाजपने इथे मात्र बराच वेळ घेतला.
Gadchiroli Chimur Loksabha Constituency
Gadchiroli Chimur Loksabha Constituency sakal

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात अनेक खलबते आणि खटपटी केल्यानंतर महायुती व महाआघाडीने अखेरच्या दोन दिवसांत आपले उमेदवार जाहीर केले. एरवी उमेदवार जाहीर करण्यात नेहमीच पुढे असलेल्या भाजपने इथे मात्र बराच वेळ घेतला. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच परत मैदानात उतरवले. मंगळवारी (ता.२६) महायुतीचे विद्यमान खासदार अशोक नेते व शेवटच्या दिवशी बुधवार (ता. २७) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरला. ३० मार्च ही अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असली तरी चित्र बरेच स्पष्ट झाले आहे. यंदा भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्यात लढत होईल, हे निश्चित झाले आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी बरीच खटपट केली होती. पण अखेर भाजपने नेतेंवरच डाव खेळायचे ठरवले. काँग्रेसमध्ये माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते व त्यांची पत्नी डॉ. चंदा कोडवते उमेदवारीसाठी धडपडत होते. पण उमेदवारी मिळत नसल्याचे बघून कोडवते दाम्पत्याने व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. तसा या तिघांकडेही फारसा जनाधार किंवा समर्थक कार्यकर्त्यांची मोठी फौज नसल्याने त्यांच्या जाण्याने काँग्रेसला फार नुकसान नाही व भाजपलाही फारसा लाभ नाही. पण निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे जेवढी लोकं गळाला लावता येतील तेवढे लावावे, असे गणित भाजपचे असू शकते.

Gadchiroli Chimur Loksabha Constituency
Ashish Shelar : सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी जागावाटपावर वेळ

या मतदारसंघात २००४ व २००९ मध्ये काँग्रेस, तर २०१४ व २०१९ मध्ये भाजप अशा दोन्ही पक्षांनी येथे वर्चस्व राखले आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे अशोक नेते यांना पाच लाख १९,९६८, तर काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांना चार लाख ४२,४४२ मते मिळाली होती. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे एक लाख ११,४६८ मते मिळवली होती. डॉ. गजबे व डॉ. उसेंडी यांची एकूण मते अशोक नेते यांच्या मतापेक्षा जास्त होतात. म्हणजेच येथे वंचितने तगडा उमेदवार दिल्याने काँग्रेसला ही जागा गमवावी लागली होती. यंदा मात्र वंचितने राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या हितेश मडावी यांना उमेदवारी दिली आहे व त्यांची मते घेण्याची क्षमता गजबेंइतकी नाही. त्यामुळे डॉ. किरसान यांच्यासोबतची नेते यांची लढत तुल्यबळ ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com