Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

पुण्यात पार पडलेल्या राहुल गांधींच्या सभेला नसीम खान यांनी हजेरी लावली.
Naseem Khan
Naseem Khan

पुणे : काँग्रेसचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते नसीम खान यांनी नुकताच आपल्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसनं महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार न दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पण त्यांची ही नाराजी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना यश आल्याचं दिसतं आहे. कारण याच नसीम खान यांनी पुण्यातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. तसेच या ठिकाणी भाषणंही केलं. (Is Naseem Khan displeasure remove because he was appeared in Rahul Gandhi rally for Ravindra Dhangekar campaign in Pune)

Naseem Khan
Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आज पुण्यातील एसएसपीएमएसच्या ग्राऊंडवर राहुल गांधींची सभा पार पडली. यावेळी राज्यातील काँग्रेसचे बडे नेते हजर होते. यावेळी व्यासपीठावर नसीम खान यांनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी धंगेकरांना निवडून देण्यासाठी भाषणंही केलं. (Latest Marathi News)

Naseem Khan
Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

नसीम खान व्यासपीठावर दिसले कारण काँग्रेसनं त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा सुरु आहे. कारण आपण महाराष्ट्रात एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. पण काँग्रेसनं त्यांची ही नाराजी दूर करताना काय आश्वासनं दिली असतील याची माहिती कळू शकलेली नाही. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com