Vidarbha IT Industry: विदर्भात आयटी क्षेत्राचा विस्तार होऊ शकत नाही! काय आहेत कारणं? जाणून घ्या

विदर्भात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, त्याची अनेक कारणं आहेत.
Vidarbha IT Industry
Vidarbha IT Industry

अमरावती : विदर्भात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनलेला असताना आधुनिक शिक्षण घेतलेला इथला तरुण आपल्या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित कधी होणार? असा सवाल राज्यकर्त्यांना वारंवार विचारत आहेत. पण इथल्या भौगोलिक स्थितीचा आणि आयटी क्षेत्राचं आधीच विक्रेंद्रिकरण झाल्यानं इथं आयटीचा विस्तार होणं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणं शक्य नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. (IT sector cannot expand in Vidarbha What are the reasons need to know)

Vidarbha IT Industry
Amravati Employment Issue: फक्त सरकारी नोकरी हाच तरुणांपुढे पर्याय का? अमरावतीतील तरुण अडकलाय चक्रव्युहात

विदर्भात एकूणच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं त्यातून अधिकारी होण्याचं आणि सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी तरुणांची धडपड पहायला मिळते आहे. पण जर सरकारी नोकरी करायचीच नसेल तर त्याला दुसरा पर्याय काय? असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा मात्र निराशा होते. कारण विदर्भात इंडस्ट्रीज नाहीत, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग नाहीत, एमआयडीसीत बडे प्रोजेक्ट नाहीत यामुळं रोजगार नाहीत.

उलट मुंबई-पुणे, बंगळुरु, हैदराबाद या महाराष्ट्र आणि लगतच्या भागात आयटी इंडस्ट्रीला बहर आहे. आधुनिक तांत्रिक शिक्षणासाठी इथं नोकऱ्यांची हमी आहे, अशी परिस्थिती विदर्भात कुठेही पहायला मिळत नाही. (Marathi Tajya Batmya)

Vidarbha IT Industry
Prakash Ambedkar: अकोला पॅटर्नमध्ये खरंच मराठ्यांना विरोध आहे का?; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं गणित

अमरावतीतील प्राध्यापक, ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक शशिकांत ओव्हळे विदर्भातील आयटी क्षेत्राच्या विकासावर भाष्य करताना सांगतात की, "आयटी क्षेत्राचा देशाच्या सर्व कोपऱ्यात विस्तार झाला आहे. त्यामुळं आधीच या क्षेत्राचं देशभरात विकेंद्रीकरण झाल्यानं आता या इंडस्ट्रीला अमरावतीसारख्या विदर्भातील मोठ्या शहरात किंवा विदर्भातच वाव नाही. (Latest Marathi News)

देशात पुणे, मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, नोयडा, गुरूग्राम या ठिकाणी आयटी हब बनलं आहे. त्यामुळं आता भारतात या क्षेत्राचा जास्त विस्तार होईल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळेच नागपुरातला मिहान प्रकल्पही अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेतच आहे"

Vidarbha IT Industry
PM Modi on Pitroda: सॅम पित्रोदांच्या 'वारसा संपत्ती'वरील विधानावर PM मोदींचं भाष्य; म्हणाले, "जिंदगी के साथ भी..."

दरम्यान, जगभरात टेक्सास्टाईल इंडस्ट्रीला फटका बसलेला असल्यानं तसेच यामध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान आल्यानं इथं प्रत्यक्ष कामगारांची गरज कमी झाली आहे. भारतातही यंत्रावर आधारित कापड उद्योग तयार झाल्यानं या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत.

Vidarbha IT Industry
Sharad Pawar : शरद पवारांनी भरसभेत ऐकवली PM मोदींची ऑडिओ क्लिप; भर सभेत केला हल्लाबोल

त्यामुळं आता अमरावतीसह विदर्भात जर रोजगार निर्मिती करायची असेल तर त्यासाठी आता केवळ कृषीवर आधारित उद्योग धंद्यांवरच भर दिला पाहिजे. जो स्थानिक शेतीचा विषय आहे तोच विकसित झाला पाहिजे. यामध्ये प्रक्रिया उद्योग असतील, उत्पादनांना चांगली बाजारपेठ निर्माणं करणं असेल तसेच शेतमाल तसेच फळांना परदेशात पाठवण्यासाठी चांगली यंत्रणा तयार करणं यातून इथं रोजगार निर्माण केला जाऊ शकतो.

त्यामुळं विदर्भातील शेती इथं पिकणारा कापूस, संत्रा, सायोबिन, डाळी आणि इतर पिकांसाठीच्या प्रक्रिया उद्योगांवर भर दिला गेला तरच शाश्वत रोजगार इथं निर्माण होऊ शकतो, असंही शशिकांत ओव्हळे यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com