INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या सभेमध्ये हाणामारी; आरजेडी अन् काँग्रेस कार्यकर्ते भिडले

INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या सभेमध्ये हाणामारी; आरजेडी अन् काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Loksabha election 2024 : झारखंडची राजधानी रांची येथे इंडिया आघाडीच्या सभेमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र बघायला मिळालं. मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि आरजेडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

रांचीतल्या प्रभात तारा मैदानावर रविवारी इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या रॅलीमध्ये झारखंडच्या चतरा लोकसभेच्या जागेवर केएन त्रिपाठी यांच्या उमेदवारीवरुन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली.

INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या सभेमध्ये हाणामारी; आरजेडी अन् काँग्रेस कार्यकर्ते भिडले
Uday Samant: मोठी बातमी! यवतमाळमध्ये उदय सामंतांच्या ताफ्यावर दगडफेक

चतरा मतदारसंघात काँग्रेसने केएन त्रिपाठी यांना उमेदवारी जाहीर केलकी आहे. परंतु रॅलीमध्ये आरजेडी समर्थकांनी केएन त्रिपाठी यांच्या नावाला विरोध दर्शवला. त्यानंतर वादावादी सुरु झाली आणि वादावादीचं रुपांतर मारहाणीत झालं.

भर सभेमध्ये काँग्रेस आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारायला सुरुवात केली. त्यानंतर काठ्या निघाल्या आणि काठ्यांनी मारझोड सुरु झाली. या घटनेत काँग्रेस उमेदवाराच्या भावाचं डोकं फुटल्याची घटना घडली आहे. शिवाय घटनेत तीन लोकं जखमी झाल्याची माहिती आहे.

INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या सभेमध्ये हाणामारी; आरजेडी अन् काँग्रेस कार्यकर्ते भिडले
Philip Salt KKR vs RCB : 6,0,6,6,W,1W कर्ण शर्मानं चोपलं! अखेर सॉल्टनं सर्वात महागड्या खेळाडूची वाचवली लाज; पाहा VIDEO

दरम्यान, मंचावर भाषण सुरु असतानाच खाली मात्र मारामाऱ्या सुरु होत्या. या सभेमध्ये मुख्यमंत्री चंपाई सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com