PM Modi in Kalyan: ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

मोदींनी कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
PM Narendra Modi Wardha
PM Narendra Modi esakal

कल्याणः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणध्ये प्रचारसभेला संबोधित केलं. कल्याण, भिवंडी आणि ठाण्याच्या उमेदवारांसाठी सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी मोदींनी कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

संबोधनादरम्यान मोदी म्हणाले की, आज मी जेवढी मेहनत करतो, तेवढीच मेहनत ४ जूननंतर सुरु राहील. शंभर दिवसांमध्ये काय करायचं, याची ब्लू प्रिंट रेडी ठेवून काम करायचं आहे. देशातील तरुणांकडे वेगवेगळ्या आयडिया आणि प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्याची त्यांच्यात हुनर आहे. सध्या मी काही तरुणांसोबत बातचित करत आहे. त्यातून मला ही गोष्ट लक्षात आली. तरुणांनी मला खूपच चांगल्या कल्पना सांगितल्या आहेत. हे माझं शंभर दिवसांचं व्हिजन आहे, त्याला मी १२५ दिवस दिवस करुन त्यामध्ये तरुणांना सहभागी करुन घेणार आहे. त्यामुळे माझं देशासाठी लक्ष्य लवकर साध्य होणार आहे.

''पूर्वी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे लोक गरीबीचा जप करत होते, त्यांनी भ्रष्टाचाराचा शिष्टाचार केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीवरुन मी तुम्हाला विचारतो, असे लोक देशाला पुढे जाऊ शकतात का? तुमचे स्वप्न पूर्ण करु शकतात का? तुमच्या मुलांचं भविष्य पूर्ण करु शकतात का? त्यांच्या सरकारने विकासाला ब्रेक लावला होता. आमच्या सरकराने ब्रेक काढून गाडी टॉप गिअरमध्ये आणली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे विश्वास आणि उत्साह आहे. आता जनतेने ठरवलं की फिर एकबार मोदी सरकार.''

PM Narendra Modi Wardha
Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस कधीच विकासाच्या गोष्टी करीत नाहीत. काँग्रेस केवळ हिंदू-मुसलमान करत आहे. त्यांच्यासाठी विकास म्हणजे त्यांचाच विकास जे त्यांना वोट देतात. ते म्हणतात, मोदीने हिंदू-मुसलमान केलं. परंतु मी ज्यांनी हिंदू-मुसलमान केलं त्यांचा कच्चाचिठ्ठा काढत आहे. काँग्रेसचं सरकार असताना ते खुलेआम म्हणत होते, देशाच्या संसाधनावर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हे डॉक्टर मनमोहर सिंहांनी म्हटलं होतं, मी त्या बैठकीला होतो. त्याचा मी विरोध केला होता. काँग्रेसवाले कीतीही ओरडले तरी उपयोग नाही, सगळं आज उपलब्ध आहे.

''डेव्हलपमेंटच्या बजेटमध्येही काँग्रेसने भिंत घातली होती. हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट.. असा विचार काँग्रेसने केला होता. १५ टक्के बजेट मुस्लिमांसाठी वेगळं करण्याचा घाट घातला होता. त्यांना धर्माच्या नावावर देश बनवायचा होता, तो त्यांनी बनवला. तुम्ही सांगा असं होऊ शकतं का? हिंदूंसाठी इतकं, मुस्लिमांसाठी एवढं.. हे पाप काँग्रेस करत होतं. सगळ्यात आगोदर मी याचा विरोध केला होता. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो.''

PM Narendra Modi Wardha
PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

''काँग्रेस आणि इंडी अलायन्स जर सत्तेत आले तर हेच करणार आहेत. प्रत्येक हिंदुस्थानी एक आहे, त्यांच्यात फूट पाडणं योग्य आहे का? महाराष्ट्रात एकही जागा इंडी आघाडीकडे गेली नाही पाहिजे. काँग्रेसची नजर एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर आहे. कर्नाटकात त्यांनी सरकारमध्ये आल्यानंतर रातोरात सगळ्या मुस्लिमांना ओबीसीमध्ये टाकलं. ओबीसीच्या आरक्षणाचा कोटा लुटला. हाच प्रकार काँग्रेसचे लोक पूर्ण देशात करणार आहेत.'' असा आरोप मोदींनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com