Lok Sabha Election Results : राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण; निकाल दुपारपर्यंत येण्याची आशा, केंद्रांभोवती संचारबंदी लागू

लोकसभा निवडणुकीची (Karnataka Lok Sabha Election Results) मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार आहे.
Karnataka Lok Sabha Election Results
Karnataka Lok Sabha Election Resultsesakal
Summary

बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रामनगर येथे होणार आहे.

बंगळूर : लोकसभा निवडणुकीची (Karnataka Lok Sabha Election Results) मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज (ता. ३) संध्याकाळपासून जूनच्या मध्यरात्री पाच वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांभोवती संचारबंदी लागू केली आहे. दारू विक्रीला बंदी आहे. मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक पर्यायी रस्त्यांकडे वळवली आहे.

कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होणार असून मतमोजणी (Counting of Votes) कर्मचाऱ्यांना संबंधित लोकसभा मतदारसंघात आधीच प्रशिक्षित करण्यात आले असल्याने सर्व २८ मतदारसंघांचे निकाल सायंकाळपर्यंत लागतील. प्रत्येक टेबलवर तीन मतमोजणी कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक आणि मोजणी सहाय्यक नियुक्त केले आहेत. मतमोजणी कर्मचारी आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना सकाळी सहा वाजता येण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी पोस्टल मतदान अधिक असल्याने मतमोजणी निरंत सुरू राहणार आहे. अंतिम फेरीपूर्वी पोस्टल मतांची मोजणी पूर्ण केली जाईल.

Karnataka Lok Sabha Election Results
Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

यावेळी प्रत्येक टेबलवर सीसी कॅमेऱ्याची व्यवस्था केली असून याशिवाय निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार इतर ठिकाणीही सीसी कॅमेरे आणि व्हिडिओग्राफीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मतमोजणीच्या कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर पोहोचेपर्यंत ते कोणत्या टेबलावर बसतील, याची माहिती नसते. चार जूनला सकाळी आल्यानंतरच कळणार आहे. सकाळी ७.४५ वाजता स्ट्राँग रूम उघडल्या जातात.

पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल आणि ईव्हीएमची मतमोजणी सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये होणार आहे. तर बंगळूर दक्षिण मतदारसंघाची मतमोजणी एसएसएमआरव्ही कॉलेज, जयनगर येथे होईल. बंगळूर मध्य मतदारसंघाची मतमोजणी माउंट कार्मेल कॉलेज येथे होणार आहे.

Karnataka Lok Sabha Election Results
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी साडेसहा तासांत पूर्ण होणार

बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रामनगर येथे होणार आहे. तुमकूर मतदारसंघाची मतमोजणी सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, तुमकूर येथे होईल. चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी देवनहळ्ळी तालुक्यातील नागार्जुन महाविद्यालयात होईल. तसेच ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून संबंधित लोकसभा मतदारसंघातील जिल्हा केंद्रातील नियुक्त मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल.

स्ट्राँग रुमना कडेकोट बंदोबस्त

राज्यात २६ मे आणि ७ मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. मतदानानंतर, मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात संबंधित लोकसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com