Loksabha Election 2024 : या चार महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील राजकीय सध्यस्थितीची जाणून घ्या माहिती

रामटेक लोकसभा मतदारसंघाने नागपूर शहराला वेढले आहे. या मतदारसंघातील सावनेर आणि उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहे.
Maharashtra Loksabha Election 2024
Maharashtra Loksabha Election 2024esakal

रामटेक (०९) : विजयाची समान संधी

रामटेक लोकसभा मतदारसंघाने नागपूर शहराला वेढले आहे. भौगोलिक क्षेत्र प्रचंड मोठे असलेल्या या मतदारसंघातील सावनेर आणि उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिंदेगटात सहभागी झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेला विजयाची समान संधी आहे.

  • ‘मविआ’चा उमेदवार अद्याप निश्चित नाही

  • शिंदे सेनेने दावा केला असला तरी भाजपला हा मतदारसंघ हवा

  • भाजप आणि शिवसेनेचा हिंदू दलित उमेदवार देण्यावर भर

  • काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांची भूमिका महत्त्वाची

हे प्रभावी मुद्दे

  • सर्व विकास नागपूरला शहराला लागून असलेल्या भागांमध्येच

  • रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात युवकांचे स्थलांतर

  • एमआयडीसीमध्ये स्थानिकांना फारसा रोजगार नाही

  • नगर परिषद, पंचायत समित्यांची सुमारे दोन वर्षांपासून निवडणूक नसल्याने स्थानिकांमध्ये रोष

नागपूर (१०) : गडकरींविरुद्ध कोण लढणार?

नितीन गडकरी यांच्या प्रभावामुळे काँग्रेसकडून एकही बडा नेता लढण्यास तयार नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत येथे होत असते. दलित व मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ‘आरपीआय’ला अस्तित्त्व निर्माण करता आले नाही. दहा वर्षांत गडकरींनी विकासामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला, कार्यकर्त्यांची फळी आणि गडकरींचे वलय यामुळे भाजपचे पारडे जड आहे.

  • महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्‍चित नाही, लढण्यासही सक्षम उमेदवार तयार नाही

  • काँग्रेसमध्ये गटबाजी. परस्परांत मतभेद

  • प्रदेशाध्यक्ष पटोले एकाच गटाला महत्त्व देत असल्याने काँग्रेसमध्ये दुफळी

  • पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने आपापसांतील सुप्त संघर्षात वाढ

  • नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस अशा दोन गटात भाजपची विभागणी

हे प्रभावी मुद्दे

  • रस्त्यांचे डांबरीकरण आणि उड्डाणपुलांचा अतिडोस

  • अतिवृष्टीने घराघरांत पाणी शिरल्याने भाजप नेत्यांवर मतदारांचा रोष

  • आरक्षणावरून अडीच लाखांच्या घरात असलेल्या हलबा मतदारांचा भाजपवर रोष

रावेर (०४) : खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष

रावेर लोकसभा क्षेत्रात जळगावचे पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभेचा समावेश आहे. जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन व भुसावळला संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत. चोपड्याला लता सोनवणे (शिंदेगट), रावेरला शिरीष चौधरी (काँग्रेस) मुक्ताईनगरला चंद्रकांत पाटील (अपक्ष, शिंदे गटाला समर्थन) असे आमदार आहेत. वर्षानुवर्षे भाजपचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात आमदार एकनाथ खडसेंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • एकनाथ खडसेंच्या स्नुषा व विद्यमान भाजप खासदार रक्षा खडसेंनाच पुन्हा उमेदवारी

  • खडसेंमुळे रक्षा यांच्या उमेदवारीबद्दल भाजपचे पदाधिकारी नाराज

  • अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचीही रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर नाराजी

  • ‘मविआ’च्या वाटपात जागा पवार गटाकडे

  • राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप निश्‍चित नाही

  • भाजपकडून सुनेला उमेदवारी मिळाल्याने एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष

हे प्रभावी मुद्दे

  • अनेक वर्षांपासून रखडलेली बोदवड उपसा सिंचन योजना

  • प्रस्तावित तापी नदीवरील मेगा रिचार्ज स्कीम

  • केळी फळपीक विम्यापासून शेतकरी वंचित

  • केळीवरील प्रक्रिया उद्योगांना चालना, प्रोत्साहन देण्याची गरज

जळगाव (०३) : शिवसेनेची भूमिका निर्णायक

जळगाव शहरासह ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा अशा विधानसभांचा समावेश आहे. पैकी जळगाव, चाळीसगावात भाजपचे, तर जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा येथे शिवसेना (शिंदे गट) आमदार आहेत. अमळनेरला राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार. जळगाव (ग्रा) येथे गुलाबराव पाटील, पाचोऱ्यात किशोर पाटील व एरंडोलमध्ये चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार असल्याने येथे शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल.

  • खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापली

  • माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपची उमेदवारी जाहीर

  • स्मिता वाघ यांचा मतदारसंघात प्रचारही सुरु

  • गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेची भूमिका महत्त्वाची

  • महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाकडे

  • ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु

हे प्रभावी मुद्दे

  • अनेक वर्षांपासून प्रलंबित पाडळसरे प्रकल्प

  • रखडलेला औद्योगिक विकास

  • कापूस उत्पादक शेतकरी जास्त असल्याने कापसाच्या दराचा मुद्दा

  • गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांचा प्रस्तावित प्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com