Kolhapur Lok Sabha : निवडणूक निकालाचे 'सोशल' वारे जोरात; अंदाज-आकडेमोड रंगली, मॉर्फ केलेल्या काही पोस्टही व्हायरल

मतदानाची वेळ संपल्यानंतर ‘झाले इलेक्शन जपा रिलेशन’ अशा स्वरूपातील संदेश काहींनी पोस्ट केले.
Kolhapur Lok Sabha Election
Kolhapur Lok Sabha Electionesakal
Summary

व्हॉटस्ॲप (WhatsApp), इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांकडून जोरात करण्यात आला.

कोल्हापूर : लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदानानंतर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील निकालाचे वारे सोशल मीडियावर (Social Media) जोरात वाहत राहिले. अनेकांनी या निकालातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळणाऱ्या मतांची आकडेमोड शेअर केली आणि त्यावर विविध ग्रुपवर चर्चा रंगली. काही ग्रुपवर तर उमेदवारांच्या छायाचित्रांसह निकालाबाबतच्या मॉर्फ केलेल्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या.

व्हॉटस्ॲप (WhatsApp), इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांकडून जोरात करण्यात आला. त्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे विविध प्रश्न, राजकीय पक्षांची कामगिरी आदी मुद्यांचा समावेश होता.

Kolhapur Lok Sabha Election
आता विधान परिषद निवडणुकीचे रणांगण; काँग्रेसला बहुमत मिळविण्याची संधी, 'इतक्या' जागांसाठी अधिसूचना जारी

मतदानाचा दिवस जसा जवळ येईल, तसे या प्रचाराचे वातावरण तापले. उमेदवारांबरोबरच त्यांच्या नेतेमंडळींचे मॉर्फ केलेले व्हिडिओ शेअर करण्यात आले. मतदानाची वेळ संपल्यानंतर ‘झाले इलेक्शन जपा रिलेशन’ अशा स्वरूपातील संदेश काहींनी पोस्ट केले. मतदारांचे आभार मानणारे संदेश अनेकांच्या स्टेटस्‌वर झळकले होते.

झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा आधार घेऊन आकडेमोड करून काहींनी निकालच जाहीर केला. त्यात उमेदवारांची छायाचित्रे, त्यांच्या पक्षाचे चिन्ह, त्यांना मिळालेली मते अशी माहिती असलेल्या मॉर्फ केलेल्या विविध पोस्ट व्हायरल झाल्या.

Kolhapur Lok Sabha Election
..अन्यथा मी लांजा-राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हाचा उमेदवार असेन; किरण सामंतांचा राजन साळवींना थेट इशारा

जुनी छायाचित्रे शेअर

या निवडणुकीत जिल्ह्यात जी नेतेमंडळी एकमेकांविरोधात मैदानात उतरली, ती सर्व एकत्रित असलेली जुनी छायाचित्रे आज सोशल मीडियावर शेअर झाली. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांच्या राजकीय पक्षांबाबत केलेली वक्तव्ये देखील त्यांच्या छायाचित्रांसह पोस्ट करण्यात आली. त्यावरही तरुणाई, कार्यकर्ते एकमेकांविरोधात चिमटे घेणारे खुमासदार संदेश पोस्ट करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com