Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

मुश्रिफांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणार असाल तर आम्हालाही विचार करावा लागेल.
Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal
Summary

वाद वाढत चालल्याचे समजताच पोलिस दाखल झाले. तरुणांनी तेथील फलक काढण्याची मागणी करताच पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले.

चंदगड : ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या सांगण्यावरून आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत असाल तर मीही छत्रपती आहे,’ अशा शब्दांत माजी खासदार संभीजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पोलिसांना (Police) सुनावले. येथील कुमार शाळेजवळील एका बूथवर कार्यकर्ते पक्षाचे झेंडे लावून मतदारांना मतदार यादी क्रमांक देत होते. त्याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर वादावादी वाढल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, ही माहिती मिळताच संभाजीराजे घटनास्थळी आले.

Kolhapur Lok Sabha
रत्नागिरी-सिंधुदुर्गात 64 टक्के मतदान; 'या' 9 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद, कोण मारणार बाजी?

त्यांनी सुनावल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून दिले. कुमार शाळेजवळ एका पक्षाचे कार्यकर्ते बूथ लावून मतदारांना (Voter) सेवा देत होते. त्यांनी बूथवर पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे लावल्याच्या मुद्यावरून दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांचा घोळका केला जात असल्याचाही त्यांचा आरोप होता. या मुद्यावर दोन्हीकडून वादावादी सुरू झाली. दुसऱ्या गटाच्या बूथवर उमेदवाराच्या फोटोसह प्रचार फलक लावलेला होता. तो काढा मग आम्ही झेंडे काढू, असा पवित्रा त्यांनी घेतला.

Kolhapur Lok Sabha
Belgaum Lok Sabha : बेळगावात 72 टक्के, तर चिक्कोडीत विक्रमी 78.63 टक्के मतदान; वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार?

वाद वाढत चालल्याचे समजताच पोलिस दाखल झाले. तरुणांनी तेथील फलक काढण्याची मागणी करताच पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले. काही वेळाने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती तेथे दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या दुटप्पीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. मुश्रिफांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणार असाल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असे पोलिसांना सुनावताच त्यांनी या कार्यकर्त्यांना सोडून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com