लक्षवेधी लढत : कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा रोमहर्षक ठरणार ; महुआ मोईत्रा विरुद्ध राजघराण्यातील अमृता रॉय यांच्यात चुरशीचा सामना

पश्‍चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा रोमहर्षक ठरणार आहे. खासदार महुआ मोईत्रा विरुद्ध राजघराण्यातील अमृता रॉय यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे.
Mahua Moitra vs. Amrita Roy of Royal Family
Mahua Moitra vs. Amrita Roy of Royal Family sakal

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा रोमहर्षक ठरणार आहे. खासदार महुआ मोईत्रा विरुद्ध राजघराण्यातील अमृता रॉय यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये ‘राजमाता’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अमृता रॉय यांना भाजपने कृष्णनगरमधून निवडणूक मैदानात उतरविले आहे. राजमाता यांच्या उमेदवारीने तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार व खासदार महुआ मोईत्रा यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

राजघराण्याचा वारसा

अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला लाभ होऊ शकेल, अशी पक्षाला आशा वाटत आहे. नादिया राजघराण्यातील अमृता रॉय यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने राज्यातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली, त्यात राजमातेच्या नावासह १११ नावांचा समावेश होता. वयाच्या १८ व्या वर्षी सिंहासनावर आरूढ झालेले कृष्णचंद्र हे सर्वगुणी राजे होते. राज्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासनात त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा करून राज्याच्या विकासात योगदान दिले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर आणि राजघराण्यातील वारसदारांवर कायमचा प्रभाव राहिला.

Mahua Moitra vs. Amrita Roy of Royal Family
Loksabha Election 2024 : नाराजांचा प्रवाहो निघाला ‘मातोश्री’कडे!

महुआ मोईत्रांवर आरोप

कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सहा लाख १४ हजार ८७२ मते मिळाली होती. भाजपच्या कल्याण चौबे यांना पाच लाख ५१ हजार ६५४ मते पडली होती. साधारण ६३ हजार मतांनी मोईत्रा यांचा विजय झाला होता. पैशाच्या बदल्यात प्रश्‍न विचारल्याच्या आरोपावरून महुआ यांची काही महिन्यांपूर्वी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मोईत्रा यांची दक्षिण कोलकतामधील कृष्णनगर आणि अलीपूरमधील निवासस्थाने आणि लोकसभा कार्यालयाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने नुकतीच झडती घेतली; परंतु तपास यंत्रणेला रिकाम्या हाताने परतावे लागले.

‘तृणमूल’ अडचणीत

भ्रष्टाचाराचे आरोप आणि पक्षातील वाद हे तृणमूल काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहेत. भाजपच्या सूत्रानुसार, स्थानिक, प्रभावशाली आणि परिचित चेहरा असलेल्या राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिल्याने पक्षाला मतांची दरी कमी करण्यास आणि कृष्णनगरमध्ये ताकद वाढविण्यात मदत होऊ शकेल.

मतांची टक्केवारी

तपस पॉल (तृणमूल काँग्रेस) ३५.१४%

डॉ. शंतनू झा (माकप) २९.४३%

महुआ मोईत्रा (तृणमूल काँग्रेस) ४५%

कल्याण चौबे (भाजप) ४०.३७%

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com