Loksabha Election 2024 : निवडणूक किस्से! खेकड्याला बेडकाचं उत्तर अन् उंदराला घेऊन गेली घार; राजीव गांधींनी केली होती टीका...

त्या निवडणुकीत अण्णा द्रमुक आणि काँग्रेसने आघाडी केली होती. राजीव गांधी यांनी कोईमतूर येथे प्रचार करताना विरोधकांना बादलीत टाकलेल्या खेकड्यांची उपमा दिली. विरोधी आघाडीतील नेते एकमेकांचे पाय खेचत असल्याचे राजीव यांना म्हणायचे होते. संवादलेखक असलेले करुणानिधी यावर गप्प बसणारच नव्हते. त्यांनी राजीव यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal

Loksabha Election 2024 Updates : निवडणूक आली की विरोधी पक्षातील नेत्यांवर शेलक्या शब्दांत टीका करण्याची पद्धत नवी नाही. ही टीका करताना अनेकदा प्राण्याची उपमा दिली जाते. विरोधी नेत्यांचा स्वभाव संबंधित प्राण्याप्रमाणेच असल्याचे सांगण्याचा त्यामागे हेतू असतो. राजीव गांधी आणि एम. करुणानिधी या दोन दिवंगत नेत्यांमधील वाक्‌युद्धही चांगलेच गाजले होते. आज जरी काँग्रेस आणि द्रमुक हे मित्रपक्ष असले तरी पूर्वी त्यांनी एकमेकांविरोधात अनेक निवडणुका लढविल्या आहेत.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची पहिलीच निवडणूक होती. देशभरात काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती. इंदिराजींचा वारसा त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्याकडे आला होता. राजीव यांनी देशभर जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकचे नेते एम.जी. रामचंद्रन आणि द्रमुकचे नेते एम. करुणानिधी या एकेकाळच्या चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांचे वर्चस्व होते.

Loksabha Election 2024
Mumbai Indians IPL 2024 : हार्दिकच्या मुंबईत रोहितच नाही तर सूर्या अन् बुमराह देखील नाराज; काय म्हणतात हर्षा भोगले?

या निवडणुकीत अण्णा द्रमुक आणि काँग्रेसने आघाडी केली होती. राजीव गांधी यांनी कोईमतूर येथे प्रचार करताना विरोधकांना बादलीत टाकलेल्या खेकड्यांची उपमा दिली. विरोधी आघाडीतील नेते एकमेकांचे पाय खेचत असल्याचे राजीव यांना म्हणायचे होते. संवादलेखक असलेले करुणानिधी यावर गप्प बसणारच नव्हते. त्यांनी राजीव यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले.

पुढच्याच सभेत करुणानिधी म्हणाले,‘‘खेकड्याने एकदा कोणाला पकडले की तो सोडत नाही. आमची जनतेच्या प्रश्‍नांवर अशीच पकड आहे. त्यामुळे आम्हाला खेकडा म्हटले असेल तर चांगलेच आहे.’’ एवढे बोलूनच ते थांबले नाहीत तर, ‘आम्ही खेकडे असू तर काँग्रेस-अण्णाद्रमुक यांच्यातील आघाडी म्हणजे बेडूक आणि उंदीर यांच्यातील आघाडी आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली. एक गोष्ट सांगत त्यांनी या टोमण्यांचे स्पष्टीकरणही दिले. बेडूक उंदराला पाण्याकडे नेण्याचा प्रयत्न करतो आणि उंदीर बेडकाला जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करतो. दोघांची ओढाओढी सुरू असताना घार येते आणि दोघांनाही आकाशात घेऊन जाते.

Loksabha Election 2024
White House Iftar: मुस्लिम धर्मियांनी 'का' धुडकावले व्हाईट हाऊसच्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण? समोर आले कारण

प्रत्यक्षात, काँग्रेसला असलेल्या सहानुभूतीच्या लाटेने या पक्षाला २५ जागांवर विजय मिळवून दिला, तर ‘एमजीआर’ यांच्याही करिष्म्याचा प्रभाव पडून अण्णा द्रमुकला १२ जागा मिळाल्या. राज्यातील ३९ पैकी ३७ जागा या आघाडीकडे गेल्या आणि केवळ दोन जागा द्रमुकला मिळाल्या. असेच चित्र पुढील दशकभर कायम राहिले. आज चित्र बदलले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि द्रमुकची आघाडी असून द्रमुकचा वरचष्मा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com