Lok Sabha Election Result
Lok Sabha Election Resultesakal

Lok Sabha Election Result: मोदी सरकारच्या 43 शिलेदारांचं काय झालं? लोकांनी अनेक मंत्र्यांना देखील बसवलं घरी

Lok Sabha Election Result 2024: केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांच्या भवितव्याचा फैसला आज झाला आहे. निवडणूक लढवणाऱ्या मंत्र्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर आदींच्या नावांचा समावेश आहे.

Lok Sabha Election Results 2024: देशातील सर्वाती मोठी निवडणूल लोकसभेचे निकाल आज जाहीर होणार आहेत. एक्झिट पोलमधून भाजप सरकारला कौल मिळाला आहे. त्यामुळे एक्झिट पोलवर शिक्कामोर्तब होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील 50 हून अधिक मंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले. त्यामुळे जनता पुन्हा त्यांनी संधी देणार का? हे देखील आज स्पष्ट होणार आहे.

मोदी सरकारमधले कोणते मंत्री मैदानात होते?

राजनाथ सिंह - विजयी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात सपाने रविदास मेहरोत्रा ​​यांना उमेदवारी दिली होती.

अमित शाह - विजयी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एकदा गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 मध्ये शहा येथून विजयी झाले होते. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसच्या सोनल पटेल यांच्याशी होता.

नितीन गडकरी- विजयी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा त्यांच्या पारंपरिक नागपुरातून निवडणूक लढवली. ते विजयी झाले आहेत. 2019 मध्ये गडकरी येथून विजयी झाले होते. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी होता.

स्मृती इराणी- पराभव

केंद्रीय मंत्री खासदार स्मृती इराणी पुन्हा एकदा भाजपच्या तिकीटावर अमेठी येथून निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला आहे. उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने गांधी घराण्याच्या जवळचे केएल शर्मा यांना उमेदवारी दिली. बसपाने येथे नन्हे सिंह चौहान यांना उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

ज्योतिरादित्य सिंधिया- विजयी

गुना लोकसभा जागा लोकप्रिय जागा राहिली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपच्या वतीने गुना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. नागरी उड्डाण आणि पोलाद मंत्री शिंदे सध्या मध्य प्रदेशातून भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसने सिंधिया यांच्या विरोधात राव यादवेंद्र सिंह यादव यांना उमेदवारी दिली होती.

पियुष गोयल- विजयी

मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे होती. गोयल सध्या महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्याकडे वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण यांसारखी महत्त्वाची खाती आहेत. पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली होती. पियुष गोयल विजयी झाले आहेत.

मनसुख मांडविया- विजयी

पोरबंदरमधील भाजपचे उमेदवार केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया विजयी झाले आहेत. मांडविया आतापर्यंत गुजरातचे राज्यसभेचे खासदार होते. या निवडणुकीत त्यांची लढत काँग्रेसचे ललितभाई वसोया यांच्याशी होती.

अनुराग ठाकूर - विजयी

हिमाचल प्रदेशची हमीरपूर लोकसभा सीटही खास आहे. येथून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पाचव्यांदा विजयी झाले. ते सध्या मोदी सरकारमध्ये क्रीडा, युवा व्यवहार आणि माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी आमदार सतपाल रायजादा यांना उमेदवारी दिली होती. अनुराग ठाकूर यांना ६ लाख ०७ हजार ०६८ मते मिळाली.

भूपेंद्र यादव - विजयी

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून विजयी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे बाबा बालकनाथ येथून विजयी होऊन खासदार झाले होते. भूपेंद्र यादव यांनी काँग्रेसचे ललित यादव यांचा पराभव केला.

कौशल किशोर -

कौशल किशोर हे उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. तर सपाकडून आरके चौधरी आणि बसपकडून राजेश कुमार मैदानात उतरले आहेत.


साध्वी निरंजन ज्योती-

मंत्री साध्वी निरंजन ज्योती उत्तर प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. साध्वी निरंजन या मोदी सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्री आहेत. या निवडणुकीत सपाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांना फतेहपूरमधून उमेदवार केले आहे.

डॉ.भारती प्रवीण पवार - पराभव

महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉ.भारती प्रवीण पवार भाजपच्या उमेदवार होत्या. या निवडणुकीत त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद गट) उमेदवार असलेल्या भास्कर मुरलीधर भगरे यांच्याशी झाला. भास्कर मुरलीधर भगरे विजयी झाले आहेत.

अन्नपूर्णा देवी-

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर महाआघाडीचे सीपीआय (एमएल) विनोद कुमार सिंग आहेत. 2019 मध्ये भाजपच्या अन्नपूर्णा देवी यांनी कोडरमा मतदारसंघातून विजय मिळवला होता.

कपिल पाटील- 

पाचव्या टप्प्यातील मंत्र्यांमध्ये भिवंडीतून कपिल पाटील यांचा समावेश आहे. कपिल पाटील यांच्याकडे केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयात राज्यमंत्रीपद आहे. या लोकसभा निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी एमव्हीएचे सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ ​​बाल्या मामा आहेत, जे राष्ट्रवादीचे (शरद गट) उमेदवार आहेत.

शंतनू ठाकूर -

पश्चिम बंगालमधील बनगाव येथून केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर टीएमसीकडून विश्वजित दास तर काँग्रेसकडून प्रदीप कुमार बिस्वास आहेत.

प्रल्हाद जोशी -

केंद्रीय कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री कर्नाटकातील धारवाड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. येथे काँग्रेसने पक्षाचे युवा नेते विनोद आसुती यांना उमेदवारी दिली आहे.

मनसुख मांडविया -

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमधील भाजपचे उमेदवार केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आहेत. मांडविया आतापर्यंत गुजरातचे राज्यसभा खासदार होते. या निवडणुकीत त्यांची लढत काँग्रेसचे ललितभाई वसोया यांच्याशी आहे. 2019 मध्ये येथून भाजपचे रमेशभाई लवजीभाई धाडूक विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत पोरबंदर मतदारसंघात ५८.९ टक्के मतदान झाले होते.

गिरीराज सिंह-

गिरीराज सिंह बिहारच्या बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी सीपीआयचे अवधेश कुमार राय यांचा सामना ग्रामीण विकास आणि पंचायती राज्यमंत्री गिरीराज यांच्याशी आहे.

अजय मिश्रा टेनी-

उत्तर प्रदेशची खेरी जागेवर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी पुन्हा भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत. या निवडणुकीत सपाने माजी आमदार उत्कर्ष वर्मा यांना तर बसपने पंजाबी समाजातील अक्षय कालरा यांना उमेदवारी दिली आहे.

नित्यानंद राय-

बिहारमधील उजियारपूरमधून नित्यानंद राय निवडणूक लढवत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले नित्यानंद मोदी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री आहेत. त्यांच्यासमोर आरजेडी नेते आणि माजी मंत्री आलोक कुमार मेहता आहेत.

धर्मेंद्र प्रधान-

ओडिशाच्या संबलपूर लोकसभा जागेवरही सत्ताधारी बिजू जनता दलाने पक्षाचे सरचिटणीस प्रणव प्रकाश दास यांना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात उभे केले आहे. ते धर्मेंद्र प्रधान यांच्याशी लढत आहेत जे 15 वर्षानंतर संबलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात परतले आहेत.

नारायण राणे- विजयी

महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरील लढतही रंजक आहे. येथून भाजपने केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव गट) दोन वेळा खासदार विनायक राऊत यांच्याशी राणेंची लढत होती. राणे विजयी झाले आहेत.

श्रीपाद येसो नाईक- आघाडी

जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक उत्तर गोव्यातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली आहे.

किरेन रिजिजू- विजयी

किरेन रिजिजू पुन्हा एकदा अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2019 मध्येही रिजिजू येथून विजयी झाले होते. यावेळी त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याशी होती. अरुणाचल पश्चिम मध्ये किरेन रिजिजू १ लाख ७३८ मते मिळाली.

संजीव बल्यान- पिछाडी

केंद्रीय मंत्री संजीव बल्यान हे उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. 2019 च्या निवडणुकीत बालियान भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांचा सामना सपाकडून हरेंद्र मलिक आणि बसपकडून दारा सिंह प्रजापती यांच्याशी आहे. या ठिकाणी हरेंद्र मलिक आघाडीवर आहेत.

फग्गन सिंग कुलस्ते- विजयी

केंद्रीय मंत्री कुलस्ते हे मध्य प्रदेशातील मांडला मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. फग्गनसिंग कुलस्ते 2019 मध्ये येथून विजयी झाले होते. यावेळी त्यांच्यासमोर ओंकार सिंग मरकाम हा काँग्रेसचा चेहरा होता. कुलस्ते हे 751375 मतांनी विजयी झाले.

निसिथ प्रामाणिक- पिछाडीवर

निसिथ प्रामाणिक पश्चिम बंगालच्या कूचबिहार मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. यावेळी त्यांचा सामना टीएमसीकडून जगदीश चंद्र बसुरिया आणि काँग्रेसच्या पिया रॉय चौधरी यांच्याशी आहे. जगदीश चंद्र बसुरिया इथं आघाडीवर आहेत.

Lok Sabha Election Result
India Lok Sabha Election Results Live : प्रतीक्षा संपली! BJPने उघडले खातं... मोदी अन् राहुल गांधी यांच्या हृदयाचे वाढले ठोके

गजेंद्र सिंह शेखावत- विजयी

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत पुन्हा एकदा त्यांच्या पारंपरिक जोधपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. शेखावत सलग दोनदा येथून विजयी झाले आहेत. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसच्या करण सिंह यांच्याशी होता. शेखावत तिसऱ्यांदा 115677 मतांनी विजयी झाले.

कैलास चौधरी- पराभव

कैलाश चौधरी पुन्हा एकदा बाडमेरमधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसचे उम्मेदारम बेनिवाल आणि शेओ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र सिंग भाटी यांच्याशी होता. कैलास चौधरी यावेळी तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेले. काँग्रेसचे उम्मेदारम बेनिवाल विजयी झाले आहेत


वीरेंद्र खाटिक-

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री वीरेंद्र खाटिक हे मध्य प्रदेशातील टिकमगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार पंकज अहिरवार यांच्या विरोधात लढत आहेत.

राजीव चंद्रशेखर-

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे केरळमधील तिरुवनंतपुरम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसकडून शशी थरूर आणि सीपीआयकडून पन्नियान रवींद्रन यांच्याशी आहे.

शोभा करंदलाजे-

केंद्र सरकारच्या कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे कर्नाटकातील बंगळुरू उत्तर मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत शोभा यांनी उडुपी चिकमंगळूरमधून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता.

व्ही. मुरलीधरन-

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे अटिंगल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसकडून अदूर प्रकाश आणि माकपकडून व्ही. जॉय यांच्याशी आहे.

अर्जुन मुंडा-

अर्जुन मुंडा हे सध्या आदिवासी व्यवहार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत. या निवडणुकीत त्यांचा सामना काँग्रेसकडून कालिचरण मुंडा यांच्याशी आहे.

किशन रेड्डी-

तेलंगणातील मतदारसंघ सिकंदराबाद येथून जी. किशन रेड्डी निवडणूक लढवत आहेत. रेड्डी हे केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री तसेच तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या निवडणुकीत श्री. किशन रेड्डी यांचा सामना काँग्रेसकडून दानम नागेंद्र आणि बीआरएसकडून टी. पद्मा राव यांच्याशी आहे.

रावसाहेब दादाराव दानवे- पराभव

केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री दानवे हे महाराष्ट्रातील जालना मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले आहेत.

राव इंद्रजीत विरुद्ध राज बब्बर- आघाडीवर

केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह हे हरियाणातील गुडगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अभिनेता आणि माजी खासदार राज बब्बर यांना उमेदवारी दिली आहे. इथं राव इंद्रजीत विरुद्ध राज बब्बर आघाडीवर आहेत.

कृष्णपाल गुर्जर- आघाडी

केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर हरियाणाच्या फरिदाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर महेंद्र प्रताप काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

सुभाष सरकार- पराभव

पश्चिम बंगालच्या बांकुरा जागेवर भाजपने पुन्हा डॉक्टर आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, टीएमसीने त्यांचे बांकुरा जिल्हा अध्यक्ष आणि वकील अरुप चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली. सुभाष सरकार यांचा पराभव झाला. 32778 मतांनी अरुप चक्रवर्ती यांचा विजय झाला.

आरके सिंह- पिछाडीवर

अराह या बिहारमधील जागेवर माजी आयएएस अधिकारी आरके सिंग सलग तिसऱ्यांदा आराह मतदारसंघातून निवडणूक लढवली. सध्या आरके सिंग केंद्रातील मोदी सरकारमध्ये ऊर्जामंत्री होते. या निवडणुकीत सीपीआय (एमएल)चे सुदामा प्रसाद आरके सिंह यांच्याशी लढत आहेत. सुदामा प्रसाद आघाडीवर आहेत.

अनुप्रिया पटेल- आघाडी

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अपना दलाच्या अनुप्रिया पटेल पुन्हा एकदा येथून निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्र सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्रीपद आहे. अनुप्रिया समोर सपाने डॉ.रमेश चंद बाइंड यांचा चेहरा केला आहे.

डॉ.महेंद्रनाथ पांडे- विजयी

उत्तर प्रदेशची चंदौली येथून भाजपने भारतीय जनता पक्षाने येथून डॉ.महेंद्रनाथ पांडे यांना उमेदवारी दिली होती. ते सध्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आहेत. सपाकडून वीरेंद्र सिंह निवडणूक लढवत होते.  

पंकज चौधरी- आघाडी

पंकज चौधरी हे उत्तर प्रदेशातील महाराजगंज मतदारसंघातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत. चौधरी मोदी सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. काँग्रेसने वीरेंद्र चौधरी यांना उमेदवारी दिली असून बसपने मोहम्मद मौसम आलम यांना उमेदवारी दिली आहे. 

Lok Sabha Election Result
Maharashtra Lok Sabha Election Results Live : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ; थोड्याच वेळात सुरू होणार मतमोजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com