Lok sabha election results 2024 : 'या' दोन राज्यांनी वाचवली भाजपची लाज; युपी, महाराष्ट्र, राजस्थान अन् हरियाणात झटके

loksabha election results 2024 pm narendra modi rahul gandhi india alliance nda : महाराष्ट्रात २०१९ मध्ये निवडून आलेल्या जागांच्या तुलनेत एनडीएची अवस्था अत्यंत वाईट आहे. इंडिया आघाडीकडे २८ ते ३० जागा जातील, अशी शक्यता आहे. अशीच काहीशी परिस्थिती राजस्थानमध्ये दिसून येत आहे. इथे भाजपने २०१९ मध्ये २५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी राजस्थानमध्ये इंडिया आघाडी ११ जागांनी आघाडीवर आहे.
Lok sabha election results 2024 : 'या' दोन राज्यांनी वाचवली भाजपची लाज; युपी, महाराष्ट्र, राजस्थान अन् हरियाणात झटके

Lok Sabha election result 2024 : देशातल्या लोकसभा निवडणुकांचे कल हाती आलेले आहेत. दुपारी अडीच वाजता आलेल्या आलेल्या कलांनुसार एनडीए २९० जगांवर आघाडीवर, इंडिया आघाडी २३५ जागांनी आघाडीवर आहेत. देशाच्या तमाम एक्झिट पोलचे सगळे अंदाज चुकीचे ठरले आहेत.

भाजपला फटका बसला तो महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमधून आणि दोन राज्यांनी भाजपवला सावरल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला एनडीएपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये निवडून आलेल्या जागांच्या तुलनेत एनडीएची अवस्था अत्यंत वाईट आहे. इंडिया आघाडीकडे २८ ते ३० जागा जातील, अशी शक्यता आहे. अशीच काहीशी परिस्थिती राजस्थानमध्ये दिसून येत आहे. इथे भाजपने २०१९ मध्ये २५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी राजस्थानमध्ये इंडिया आघाडी ११ जागांनी आघाडीवर आहे.

हरियाणामध्ये भाजपने २०१९ मध्ये सर्वच्या सर्व १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र इंडिया आघाडीला भाजपपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश आणि ओडिशाने वाचवली लाज

एनडीएसाठी आंध्र प्रदेश आणि ओडीशा हे दोन राज्य दिलासा देणारे ठरले आहेत. याच दोन राज्यांमध्ये भाजपला २०१९च्या तुलनेत जास्त जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळेच भाजप तिसऱ्यांदा सत्तेत बसेल, असं चित्र आहे.

विशेष म्हणजे या दोन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. दोन्ही राज्यांमध्ये एनडीएचं सरकार स्थापन होताना दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com