Lok Sabha Election : निवडणुकीच्या खर्चात सोलापूर मतदारसंघ आघाडीवर; सातपुतेंचा ८१ लाख तर शिंदेंचा ७४ लाख खर्च

सोलापुरात भाजपकडून आमदार राम सातपुते व काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे मैदानात होत्या.
lok sabha election solapur ram satpute and praniti shinde expenses politics
lok sabha election solapur ram satpute and praniti shinde expenses politicsSakal
Updated on

सोलापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात प्रचंड चुरस बघायला मिळाली. माढ्यात काय होईल अन्‌ सोलापुरात काय होईल? याची प्रचंड उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या उत्सुकतेपोटी चौकशी करताना समोरच्याकडून एकच उत्तर मिळतेय आहे, फाइट ताईट आहे.

घासून झालंय, जो कोणी येईल, तो पाच-पन्नास हजाराच्या आत ना बाहेर असेल. माढ्यापेक्षा सोलापूरची लढत अधिक तगडी होती. सोलापुरात भाजपकडून आमदार राम सातपुते व काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे मैदानात होत्या. दोन युवा, आक्रमक उमेदवार मैदानात असल्याने खर्च तर होणारच. निवडणुकीच्या खर्चात माढ्यापेक्षा सोलापूरच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा विचार करता, सोलापुरातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांचा खर्च सर्वाधिक म्हणजे ८१ लाख रुपये आहे. त्या खालोखाल सोलापुरातीलच काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा खर्च ७४ लाख रुपये आहे.

सोलापूरच्या तुलनेत माढ्यातील दोन्ही उमेदवारांचा निवडणूक खर्च कमीच आहे. माढ्यातील भाजप उमेदवार तथा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा खर्च ६२ लाख रुपये आहे. माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा निवडणूक खर्च ५१ लाख रुपये आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सादर केलेल्या

खर्चाची पडताळणी, खर्चातील तफावत दूर करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. या निवडणुकीतील हा खर्च अंतिम नसल्याने या खर्चात कपात किंवा वाढ होऊ शकते, अशी माहिती निवडणूक खर्च पडताळणी समितीने दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर खर्चाची मोजणी करण्यास सुरवात होते. उमेदवाराचा खर्च हा मतमोजणीपर्यंतचा खर्च निवडणूक खर्चात ग्राह्य धरला जातो.

लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला ९५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्यास परवानगी आहे. उमेदवाराच्या पक्षाला कितीही खर्च करण्यास परवानगी आहे. मतमोजणी दिवशी उमेदवारांनी आणलेल्या गाड्या, कार्यकर्ते यांचा देखील समावेश निवडणूक खर्चात केला जातो. लोकसभा निवडणुकीत ९५ लाखांच्या वर खर्च करणाऱ्या उमेदवाराला अपात्र करण्याची तरतूदही निवडणूक नियमावलीत आहे.

आकडे बोलतात...

उमेदवारांचा आतापर्यंतचा खर्च

  • सोलापूर : भाजप उमेदवार राम सातपुते : ८१ लाख रुपये

  • सोलापूर : काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे : ७४ लाख रुपये

  • माढा : भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर : ६२ लाख रुपये

  • माढा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार : धैर्यशील मोहिते-पाटील : ५१ लाख रुपये

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी दाखविलेला खर्च हा अंतिम नाही. आता असलेल्या आकड्यांमध्ये वाढ किंवा कपात होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा खर्च अंतिम करण्यासाठी २९ जूनची मुदत आहे. तत्पूर्वी निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा निवडणूक खर्च पडताळणी समिती यांची बैठक होऊन उमेदवारांच्या खर्चात आकडे अंतिम केले जातील.

— कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com