'बसप' बिघडवणार 'सप', 'भाजप'चे गणित; दलित, मुस्लिम मते BSP च्या बाजूने जाणार? जातीचे समीकरणं ठरणार निर्णायक!

बसपच्या उमेदवारांमुळे समाजवादी पक्षालाही फटका बसू शकतो.
 BSP Mayawati
BSP Mayawatiesakal
Summary

कधी काळी उत्तर प्रदेशच्या राजकारणात दबदबा असलेल्या मायावतींच्या (Mayawati) बसपसाठी हक्काने मते देणारा एक मोठा वर्ग अजूनही आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या राजकारणावर जातीय समीकरणे मोठा प्रभाव टाकतात आणि त्याचमुळे या राज्यात कोणतीही निवडणूक आली की जातीची गणिते सुरू होतात. यावेळची लोकसभा निवडणूक त्याला अपवाद नाही. राज्यातील बहुतांश जागा जिंकण्याचे स्वप्न बाळगलेल्या भाजपसाठी (BJP) अनुकूल स्थिती असली तरी ‘बसप’ने (BSP)जातीय समीकरणे लक्षात ठेवून विविध मतदारसंघांत उभ्या केलेल्या उमेदवारांमुळे भाजपचे गणित काही प्रमाणात बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बसपच्या उमेदवारांमुळे समाजवादी पक्षालाही फटका बसू शकतो. कधी काळी उत्तर प्रदेशच्या राजकारणात दबदबा असलेल्या मायावतींच्या (Mayawati) बसपसाठी हक्काने मते देणारा एक मोठा वर्ग अजूनही आहे. विशेषत: दलित आणि मुस्लिम मते (Muslims Voting) बसपच्या बाजूने जातात. बिजनौर मतदारसंघात ‘रालोआ’मध्ये सामील असलेल्या राष्ट्रीय लोकदलाचे चंदन चौहान नशीब आजमावत आहोत. याठिकाणी सपने दीपक सैनी यांना उमेदवारी दिली आहे. तर, बसपचे जाट समाजाच्या चौ. वीरेंद्र सिंह यांना मैदानात उतरवले आहे. रालोआने गुर्जर समाजाचा उमेदवार उभा केल्याने जाट मतदार बसपकडे जाऊ शकतात.

 BSP Mayawati
Jayant Patil : भाजपला '400 पार' राहू देत '200 पार' होताना नाकीनऊ येईल; आमदार जयंत पाटलांनी लगावला टोला

मेरठ : मेरठमध्ये भाजपने अरुण गोविल यांना संधी दिली आहे. याठिकाणी ‘सप’च्या सुनीता वर्मा निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ३७ टक्के असली तरी कोणत्याही प्रमुख पक्षाने मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. ‘बसप’ने सवर्ण हिंदू असलेल्या देवव्रत त्यागी यांना संधी दिली आहे. याचा भाजपचा फटका बसू शकतो.

चंदौली: चंदौलीमध्ये गतवेळी भाजपच्या महेंद्रनाथ पांडे यांचा केवळ १३ हजार मतांनी विजय झाला होता. ‘बसप’ने यावेळी सत्येंद्र मौर्य यांना तिकीट देत भाजपची वाटचाल बिकट बनवली आहे. ‘सप’ने राजपूत मते डोळ्यासमोर ठेवत माजी मंत्री वीरेंद्र सिंह यांना तिकीट दिले आहे.

 BSP Mayawati
दक्षिण महाराष्ट्रातून 'घड्याळ' गायब! बालेकिल्ल्यातच नाही चिन्ह; राष्ट्रवादी फुटीनंतर कोल्हापूर, सांगली, साताराचे चित्र

आझमगड : आझमगडमध्ये भाजप उमेदवार निरहुआ यादव यांचा मुकाबला ‘सप’च्या धर्मेंद्र यादव आणि ‘बसप’च्या भीम राजभर यांच्याशी होत आहे. ‘बसप’च्या उमेदवारामुळे याठिकाणी यादव यांची स्थिती मजबूत बनली आहे.

घोसी : मुस्लिमबहुल घोसी मतदारसंघात ‘बसप’ने विद्यमान खासदार अतुल राय यांचे तिकीट कापत बालकृष्ण चौहान यांना संधी दिली आहे. ‘रालोआ’कडून सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अरविंद राजभर मैदानात आहेत. ‘सप’कडून राजीव राय मैदानात आहेत. याठिकाणी ‘बसप’ जिंकण्याच्या स्थितीत आहेत.

कन्नौज: ‘सप’चा बालेकिल्ला असलेल्या कन्नौजमध्ये भाजपच्या सुब्रत पाठक यांची लढत ‘सप’, ‘बसप’ उमेदवारासोबत होत आहे. ‘बसप’ने याठिकाणी इमरान बीन जाफर यांना तिकीट दिले आहे.

मुझफ्फरनगर : मुझफ्फरनगरमध्ये ‘बसप’चे दारासिंह प्रजापती निवडणूक लढवीत आहेत. भाजपने जाट नेते संजीव बाल्यान यांना संधी दिली आहे. तर ‘सप’कडून हरेंद्र मलिक मैदानात आहेत. ‘बसप’चा उमेदवार याठिकाणी भाजपचे नुकसान करणार काय, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

एटा : एटा मतदारसंघात ‘बसप’चे महंमद इरफान निवडणूक लढवीत आहेत. माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे पुत्र राजवीर सिंह भाजपचे उमेदवार आहेत. ‘बसप’ने मुस्लिम उमेदवार दिल्याने राजवीर यांचा मार्ग सुकर बनला आहे.

अमरोहा : अमरोहामध्ये भाजपने गतवेळी पराभूत झालेल्या कँवर सिंह तंवर यांच्यावर विश्वास टाकला आहे. ‘बसप’ने डॉ. मुजाहिद हुसेन यांना संधी दिली आहे तर ‘बसप’चे माजी नेते दानिश अली कॉंग्रेसतर्फे लढा देत आहेत. येथील निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

 BSP Mayawati
Satara Lok Sabha : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत; पवारनिष्ठा पणाला!

रामपूर : रामपूरमध्ये आझम खान यांचे वर्चस्व कमी झाले आहे. भाजपने येथून घनश्याम लोधी यांना तिकीट दिले आहे. २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ‘सप’ने मौलाना मोहिबुल्लाह नदवी यांना संधी दिली आहे. तर ‘बसप’कडून जीशान खान मैदानात आहेत.

मुरादाबाद : मुरादाबादमध्ये ‘सप’ने एस. टी. हसन यांचे तिकीट कापले होते. ‘सप’कडून रुची वीरा तर भाजपकडून सर्वेश सिंह मैदानात आहेत. हसन यांची नाराजी यावेळी ‘सप’ला महागात पडू शकते.

कैराना : ‘बसप’ने भाजपवर नाराज असलेल्या राजपूत समाजातील श्रीपाल राणा यांना कैरानामध्ये तिकीट दिले आहे. भाजपने प्रदीप चौधरी यांना तर ‘सप’ने प्रदीप चौधरी यांना मैदानात उतरवले आहे.

सहारनपूर : सहारनपूरमध्ये ‘बसप’ने माजिद अली यांचा मुकाबला भाजपच्या राघव लखनपाल आणि कॉंग्रेसच्या इमरान मसूद यांच्याशी होत आहे. ‘बसप’च्या मुस्लिम कार्डमुळे मसूद यांचा विजयासाठी संघर्ष करावा लागेल.

बरेली : बरेलीमध्ये ‘बसप’च्या छोटेलाल गंगवार यांचा मुकाबला भाजपच्या छत्रपाल गंगवार यांच्याशी होईल. छत्रपाल हे भाजपचे दिग्गज नेते संतोष गंगवार यांचे पुत्र आहेत.

 BSP Mayawati
Supriya Sule : 'शरद पवारांना संपविणं एवढं सोपं नाही'; सुप्रिया सुळेंचा कोणावर वार?

‘बाहुबली’ नेत्याची पत्नी मैदानात

जौनपूरमध्ये भाजपचे कृपाशंकर सिंह मैदानात आहेत. बसपने त्यांच्यासमोर ‘बाहुबली’ नेते धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला यांना मैदानात उतरवले आहे. तर सपकडून बाबूलाल कुशवाह लढत आहेत. बदायूं, पिलीभीत, डुमरियागंज, लखीमपूर खिरी, सुलतानपूर, फरुखाबाद, बांदा या मतदारसंघांमध्ये देखील बसपच्या उमेदवारांमुळे कोठे भाजपचे तर कोठे सपचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com