Lok Sabha Result: इंडिया आघाडीत असूनही काँग्रेसने शरद पवारांच्या खासदाराला का पाडलं? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

Lok Sabha Result 2024 : आता काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद हमदुल्ला सईद यांनी मोहम्मद फैजल यांचा 2647 मतांनी पराभव केला. हमदुल्ला हे लोकसभेत रेकॉर्ड बनवणारे पीएम सईद यांचे पुत्र आहेत.
Lok Sabha Result 2024 Lakshadweep
Lok Sabha Result 2024 Lakshadweep esakal

पंतप्रधान मोदींनी ज्या लक्षद्वीपचे कौतुक केले. तेथील लोकसभेची निकालाच्या दिवशी चांगलीच चर्चेत राहीली. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जागेवर काँग्रेसने पुन्हा एकदा कब्जा केला आहे. पण ते फक्त विजय-पराजयाचे नाही. आणखीही काहीतरी आहे. जर आपण त्याच्या इतिहासात गेलो तर कथा पूर्ण चित्रपटासारखी वाटेल. येथून राष्ट्रवादीचे दोन वेळा मोहम्मद फैजल यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते. खासदार, आमदार शरद पवार यांना सोडून जात असताना मोहम्मद फैजल मात्र निष्ठावंतर राहीले.

आता काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद हमदुल्ला सईद यांनी मोहम्मद फैजल यांचा 2647 मतांनी पराभव केला. हमदुल्ला हे लोकसभेत रेकॉर्ड बनवणारे पीएम सईद यांचे पुत्र आहेत. आता त्यांनी दोन वेळच्या खासदाराचा पराभव करून केवळ वडिलांची जागाच परत घेतली नाही, तर आपल्या मेहुण्या मोहम्मद सलीह यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदलाही घेतला.

लक्षद्वीपमध्ये 1967 मध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. त्यानंतर पी.एम. सईद यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2014 पर्यंत सलग 10 वेळा विजय मिळवला. पण 2019 मध्ये त्यांना अवघ्या 71 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही महिन्यांनंतरच त्याचा मृत्यू झाला.

Lok Sabha Result 2024 Lakshadweep
Lok Sabha Election Result : लोकसभेच्या निकालानंतर शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वापुढे प्रश्नचिन्ह! विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माविआचे मनोधैर्य उंचावलं

लक्षद्वीपचे सलग 10 वेळा खासदार असलेले पी.एम. सईदचा जावई मोहम्मद सालीह यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी मोहम्मद फैजलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी 11 जानेवारी 2023 रोजी ते खासदार असताना त्यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यान्वये लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले.

Lok Sabha Result 2024 Lakshadweep
Lok Sabha Election Result : राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी! ठाकरे, पवारांची जादू चालली

मात्र निवडणुकीला केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने न्यायालयाने खासदारकी रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय झाला नाही. देशाच्या हितासाठी निवडणुका रद्द केल्या जात नाहीत, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.

देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट इंडिया आघाडीत असताना काँग्रेसने उमेदवार का दिला? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अजित पवार गटाला दूर ठेवण्यासाठी हा निर्णय झाल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने येथे टीपी युसूफ यांना उमेदवारी दिली होती.  भाजपने येथे आपले उमेदवार उभे केले नव्हते. त्यांनी अजित पवार यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार टीपी युसूफ यांना पाठिंबा दिला होता

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार मुहम्मद हमदुल्ला सईद यांनी लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातून 25726 मतांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे महंमद फैसल यांना 23079 मते मिळाली. हमदुल्ला सईद यांनी मोहम्मद फैसल यांचा 2647 मतांनी पराभव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com