Lok Sabha Election Result : राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी! ठाकरे, पवारांची जादू चालली

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून सत्ताधारी महायुतीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
Lok Sabha Election Result Mahavikas Aghadi got 29 Out of 48 seats Mahayuti 18 and Independents one Sharad Pawar Udhhav Thackeray
Lok Sabha Election Result Mahavikas Aghadi got 29 Out of 48 seats Mahayuti 18 and Independents one Sharad Pawar Udhhav Thackeray

मुंबई, ता. ४ : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून सत्ताधारी महायुतीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. राज्यातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला २९ तर महायुतीला १८ आणि अपक्षांना एक जागा मिळाली आहे.

भारतीय जनता पक्षाला गतवेळेपेक्षा बारा जागांचे नुकसान सोसावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे.

काँग्रेसला १२, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सात अशा महाविकास आघाडीला २९ जागा मिळाल्या. भाजपला ११, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला एक अशा २० जागा मिळाल्या आहेत. सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला (एनडीए) ४१ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणाही निवडून येताच भाजपच्या गोटात गेल्या होत्या. अशा ४२ जागा असलेल्या महायुतीला (एनडीए) या निवडणुकीत २२ जागांचे नुकसान झाले असून त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचा केंद्रात स्वबळावर सत्ता गाठण्याचा मार्ग खडतर बनला.

Lok Sabha Election Result Mahavikas Aghadi got 29 Out of 48 seats Mahayuti 18 and Independents one Sharad Pawar Udhhav Thackeray
Mandi Constituency Lok Sabha Election Result: राजकुमारावर क्विननं मारली बाजी; मंडीमधून कंगना रनौत विजयी, चित्रपटातून घेणार संन्यास ?

नितीन गडकरी, पियुष गोयल, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, नारायण राणे आणि डॉ. भारती पवार हे केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी गडकरी, पियुष गोयल आणि नारायण राणे हे तिघे निवडून आले असून अन्य तिघांना पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीच्या चुरशीच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला, तर आणखी एका लक्षवेधी लढतीमध्ये पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांच्यावर मात केली. कोल्हापुरातून काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि साताऱ्यातून भाजपचे उदयनराजे भोसले हे राजघराण्याशी संबंधित दोन्ही उमेदवार विजयी झाले असून शाहू महाराज पहिल्यांदाच तर उदयनराजे तिसऱ्यांदा लोकसभेत जात आहेत.

Lok Sabha Election Result Mahavikas Aghadi got 29 Out of 48 seats Mahayuti 18 and Independents one Sharad Pawar Udhhav Thackeray
Sangli Constituency Lok Sabha Election Result: विशाल पाटलांचा लिफाफा दिल्लीत पोहचला, कदमांनी केला संजयकाकांचा करेक्ट कार्यक्रम?

२१ विद्यमान खासदारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, प्रख्यात वकील उज्ज्वल निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आदींचा समावेश आहे. जात प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाने निवड रद्द केलेल्या नवनीत राणा यांना निवडणुकीचा अर्ज भरण्यादिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, मात्र लोकांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे जात पडताळणी समितीने चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र रद्द केलेल्या रामटेकच्या रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना निवडून देऊन तेथील मतदारांनी त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन केले आहे.

२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजधानी मुंबईतील सहापैकी सहा जागा जिंकणाऱ्या महायुतीला मोठा दणका बसला असून सहापैकी पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. फक्त उत्तर मुंबईची एकच जागा भाजपला म्हणजे महायुतीला मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com