Loksabha Election 2024 : शरद पवारांचा उमेदवार केंद्रीय मंत्र्याला कशी फाईट देणार? कोण आहेत भास्कर भगरे?

भारती पवारांचे तिकिट कापले जाणार ही चर्चा लोकसभेच्या रणधूमाळी सुरू झाली तेव्हा पासूनच होती, याचे कारण म्हणजे मतदारसंघात त्यांच्याबाबात रोष असल्याचे भाजप पदाधिकारी खासगीत सांगत होते. पण भाजप पक्षक्षेष्ठींनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी दिली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal

राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांचे ठिकठिकाणी फटाके फोडत स्वागत करण्यात आले. गोंडेगाव या त्यांच्या गावी फटाक्याची आतषबाजी करत साखर वाटत ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. त्यांनी ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेतले. भास्कर भगरे नेमके कोण आहेत, शरद पवारांनी त्यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या विरोधात उतरवलं आहे, पवारांना नरहरी झिरवळांची ताकद कमी करायची आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

दिंडोरी निफाड चांदवड तालुक्याच्या सीमेवरील दिंडोरी तालुक्यातील अत्यंत छोट्याशा जेमतेम 400 लोकवस्तीच्या गोंडेगाव गावातील सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील भास्कर भगरे यांनी एमएबीएड शिक्षण घेतले असून ते पिंपळगाव येथील कन्या विद्यालय येथे उपशिक्षक म्हणून काम करत आहेत.

स्वच्छ प्रतिमा आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने दिंडोरी भागात ते फेमस आहेत. २००५ साली पिंपळगावच्या रहिवाशांनी त्यांची समाजसेवा वृत्ती बघत त्यांना बिनविरोध गावाची धुरा देत सरपंच केले. पुढे राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे यांनी त्यांना पंचायत समितीमध्ये संधी दिली ते पुढे सभापती झाले. त्यांची जनतेचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याची हतोटी, भांडणांमध्ये केल्या जाणाऱ्या मध्यस्थीमुळे ते लोकप्रिय आहेत.

पुढे ते जिल्हा परिषदेत उभे राहिले परंतु माजी आमदार धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यातून खचून न जाता आपला जनसंपर्क काम सुरू ठेवले. पुढे पोटनिवडणूक झाली अन् भगरे प्रचंड मताधिक्याने विजयी होत जिल्हा परिषदेत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून कार्यरत असणारे भगरे हे आमदार नरहरी झिरवाळांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे, झिरवाळांची प्रचाराची धूरा ही त्यांच्याच खांद्यावर असे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना जनसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवणे कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, आमदार झिरवाळ अजित पवार गटात गेले तर भगरे यांनी शरद पवार यांचे सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडे कुणीही सक्षम उमेदवार लोकसभेसाठी नसताना भगरे यांना पदाधिकाऱ्यांनी उभे राहण्याची गळ घातली. मोठा मतदारसंघ व निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक रसद आपल्याकडे नसल्याने त्यांनी मला शक्य नाही, असे सांगितले. मात्र राष्ट्रवादी व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही लढा आम्ही आहे हा विश्वास देत तयारी सुरू केली.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनीही त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दोन महिन्यांपूर्वीच देत त्यांना मतदारसंघात संपर्क करण्यास सांगितले. पूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, धनराज महाले यांचेसोबत मतदारसंघात प्रचार केलेला असल्याने मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तसा त्यांचा परिचय असून यंदा त्यांना शिवसेनेची मोठी साथ मिळणार आहे. जनतेचे प्रश्न समजावून घेवून ते मार्गी लावण्याची त्यांची हातोटी असून त्यांनी गेले चार महिने जनतेच्या समस्या ऐकून घेत त्यावरच जनतेचा जाहीरनामा बनवला आहे.

Loksabha Election 2024
Arvind Kejriwal : 'आप'च्या मंत्री आतिशी करणार मोठा गौप्यस्फोट; उद्या सकाळी दहा वाजता...

पण भगरेंना आव्हान असणार आहे ते, भारती पवार यांचे. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या मुळच्या राष्ट्रवादीच्या पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२९ ची लोकसभा जिंकली, या विजयामध्ये शिवसेनेची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं.

भारती पवारांचे तिकिट कापले जाणार ही चर्चा लोकसभेच्या रणधूमाळी सुरू झाली तेव्हा पासूनच होती, याचे कारण म्हणजे मतदारसंघात त्यांच्याबाबात रोष असल्याचे भाजप पदाधिकारी खासगीत सांगत होते. पण भाजप पक्षक्षेष्ठींनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी दिली. आदिवासी भागात न केलेली कामे, पक्षांतर्गत विरोध आणि कांदा प्रश्नी न घेतलेली भूमिका यामुळे आता तरी भारती पवार या बॅकफूटला आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आदिवासी समाजाचे मतदान हे नेहमी निर्णायक ठरते. दुसऱ्या बाजूला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचीही या भागात चांगली पकड आहे. गेली तीन निवडणुका त्यांचा उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावर असतो, माकप सध्या महाविकास आघाडीसोबत असल्याने माकपची ताकद ही भगरेंच्या मागे उभी राहु शकते पण माकपचे नेते जे. पी. गावित दिंडोरीमधून लोकसभा लढवण्याच इच्छूक होते. त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी झाल्यास भगरेंची अडचण होऊ शकते, तर महायुतीतही बंड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ३ टर्म खासदार असणारे हरिशचंद्र चव्हाण हे लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळे ते अपक्ष उभे राहिल्यास भारती पवारांची दुहैरी कोंडी होउ शकते.

Loksabha Election 2024
Lok sabha election 2024 : निवडणुका भारतात तयारी अमेरिकेत; 'या' नेत्याला पाठिंबा देण्यासाठी 20 शहरांमध्ये रॅली

भारती पवारांसमोर अजून एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे कौटुंबिक कलहाचे. दिंडोरी मतदारसंघात भारती पवारांच्या जाऊबाई राजश्री पवार अपक्ष म्हणून उतरू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास भारती पवारांना हा चक्रव्यूव्ह भेदणं अशक्य मानलं जात आहे.

भास्कर भगरेंकडे, आदिवासी सामजातील नेतृत्व, तगडा जनसंपर्क आणि शरद पवारांचा पाठीवरती असणारा हात या काही त्यांच्या जमेच्या बाजू असल्यातरी नरहरी झिरवाळ किती ताकदीने भारती पवारांच्या मागे उभे राहतात, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. झिरवाळांचे विशेष असे मतदान असल्याने भगरेंच्या विरोधात प्रचाराला झिरवाळ उतरल्यास सामना अजून अटीतटीचा होणार हे मात्र नक्की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com