Loksabha election 2024 : ''आमच्या गॅरंटीवर विश्वास ठेवा... एकदा संधी देऊन बघा'' मोदींचं तमिळनाडूमध्ये आवाहन

तिरुनेलवेली जिल्ह्यातील अंबासमुद्रम येथे प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी नवमतदारांना कळकळीचे आवाहन केले. ते म्हणाले,‘‘भारताला २०४७ या वर्षापर्यंत सामर्थ्यवान आणि विकसित बनविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक विकासासाठी भाजपला मतदान करा आणि तुमच्या सेवेची एकदा संधी द्या.’’
Narendra Modi
Narendra Modisakal

चेन्नई : भाजपच्या लाटेला आतापर्यंत अजिबात थारा न दिलेल्या तमिळनाडूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आमच्या गॅरंटीवर विश्‍वास ठेवा आणि एकदा संधी देऊन पाहा,’ असे आवाहन केले. १९ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणाऱ्या तमिळनाडूमधील मोदींचा आजचा आठवा व अखेरचा दौरा होता. यावेळी त्यांनी प्रथमच मतदान करणाऱ्या युवा पिढीला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

तिरुनेलवेली जिल्ह्यातील अंबासमुद्रम येथे प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी नवमतदारांना कळकळीचे आवाहन केले. ते म्हणाले,‘‘भारताला २०४७ या वर्षापर्यंत सामर्थ्यवान आणि विकसित बनविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक विकासासाठी भाजपला मतदान करा आणि तुमच्या सेवेची एकदा संधी द्या.’’

Narendra Modi
PM Modi Interview : ''इलेक्टोरल बाँड नसतील तर...'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

मोदींनी प्रचारादरम्यान तमिळनाडूतील विविध शहरांमध्ये रोड शो आणि सभा घेतल्या. यावेळी जनतेचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून भारावून गेल्याचे मोदी यांनी सांगितले. भाजपला मिळत असलेला प्रतिसाद पाहून राज्यातील सत्ताधारी द्रमुकने प्रचारमोहिमांमध्ये अडथळे आणण्यास सुरुवात केली. मात्र, तमीळ जनतेने घाबरून जाऊ नये, मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Narendra Modi
PM Modi : युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात हस्तक्षेप केला? PM मोदींनी स्वतःच दिलं उत्तर

मोदी म्हणाले...

- तमीळ महिलांचा भाजपला पाठिंबा

- मागील १० वर्षांत भाजप सरकारने अनेक योजना राबविल्या

- काँग्रेसचे दिवंगत नेते कामराज हे खरे देशभक्त नेते होते, त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com