PM Modi : युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात हस्तक्षेप केला? PM मोदींनी स्वतःच दिलं उत्तर

PM Modi Interview : युक्रेनमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा तेथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आलं होतं.
PM Narendra Modi On return of Indian students from Ukraine during the war with Russia
PM Narendra Modi On return of Indian students from Ukraine during the war with Russia

PM Modi Interview Latest News : युक्रेनमध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा तेथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या परत आणण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेन-रशिया युद्धात हस्तक्षेप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. भाजपकडून जाहिरातीच्या माध्यमातून याचे क्रेडिट पंतप्रधान मोदींना देण्यात आले. दरम्यान आज खुद्द पंतप्रधान मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा तेथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आलं. ही एक मन हेलावणारी घटना होती. यामध्ये तुम्ही युद्ध थांबवण्यासाठी वयक्तिकरित्या हस्तक्षेप केल्याचे ऐकण्यात आले, याबद्दल काहीतरी सांगा असा प्रश्न विचारण्यात आला.

याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनची चर्चा जरा जास्त झाली, पण २०१४ पासून अशा अनेक घटना घडल्या आहेत. सुषमा स्वराज यांची एक मुलाखत आहे, ज्यामध्ये त्यांनी येमेनमधून आम्ही कसं भारतीय नागरीकांना परत घेऊन आलो याबद्दल सांगितले आहे. सौदीचे राजे यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांना सांगितलं की यमन येथून नागरिकांना परत घेऊन यायचं आहे, तुमच्याकडून हल्ले सुरू आहेत, तेव्हा त्यांनी काही वेळ मागितला. पण भारताच्या विनंतीनंतर एका ठराविक वेळी बॉम्बफेक बंद होत असे, त्या वेळेत आम्ही विमानात आपल्या लोकांना परत घेऊन येत असू. येमेनमधून किमान पाच हजार लोकांना परत आणले होते असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

PM Narendra Modi On return of Indian students from Ukraine during the war with Russia
Narendra Modi Interview: 'प्राण जाये पर वचन ना जाये'; गॅरंटीच्या घोषणेबाबत पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली भूमिका

तसेच युक्रेनमध्येही घडले. माझे युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी घनिष्ठ नाते राहिले आहे. दोन्ही राष्ट्रपतींसोबत चांगली माझी मैत्री आहे. मी जाहीरपणे राष्ट्रपती पुतीन यांना ही युद्धाची वेळ नाही असे सांगू शकतो. तसंच मी युक्रेनला देखील जाहीरपणे सांगू शकतो की चर्चेचा मार्ग आवलंबला पाहीजे. यामुळे माझी विश्वासार्हता आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi On return of Indian students from Ukraine during the war with Russia
Narendra Modi Interview: IPS अधिकारी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष; नरेंद्र मोदींनी तोंडभरुन कौतुक केलेले अन्नामलाई कोण आहेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com