Loksabha Election 2024 : राणा दाम्पत्याने घेतली अडसूळ यांची भेट, नाराजी दूर झाल्याची चर्चा

मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राणा दाम्पत्य व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कुटुंबीयांची आज भेट घडून आली. महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी बुधवारी (ता.१८) माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नवसारीस्थित निवासस्थानी भेट दिली. मात्र यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ हे शेगाव येथे असल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले.
navneet rana and ravi rana
navneet rana and ravi ranasakal

मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राणा दाम्पत्य व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कुटुंबीयांची आज भेट घडून आली. महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी बुधवारी (ता.१८) माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नवसारीस्थित निवासस्थानी भेट दिली. मात्र यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ हे शेगाव येथे असल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्याशी राणा दाम्पत्याचर्चा केली. विशेष म्हणजेो, राणा दाम्पत्याने सकाळीच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांच्या राठीनगर येथील निवासस्थानी जाऊन जवळपास २५ मिनिटे बंदद्वार चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अमरावती लोकसभेच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा शिल्लक असून प्रचाराने वेग घेतला आहे. त्याच अनुषंगाने राणा दाम्पत्याने आधी प्रवीण पोटे यांच्याशी व नंतर माजी आमदार अभिजित अडसूळ यांची भेट घेतली.

विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांच्या समर्थकांनी अद्यापही महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या बाजूने प्रचारात उडी न घेतल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभेची जागा शिवसेनेसाठी सोडावी, यासाठी अडसूळ पिता-पुत्र सुरवातीपासूनच आग्रही राहिले आहेत. मात्र ही जागा भाजपच्या पारड्यात गेली.

navneet rana and ravi rana
नवनीत राणांना ‘सर्वोच्च’ दिलासा, कोर्टात काय घडलं? | Navneet Rana

राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू वा मित्र नसतात. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजप, शिवसेनेसह सर्व घटक पक्ष प्रयत्न करीत आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ हेसुद्धा राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेताहेत. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यानुसार आपण राणा दाम्पत्याचे स्वागत केले. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील दिशा ठरविली जाईल.

-अभिजित अडसूळ, माजी आमदार, दर्यापूर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ४०० पारची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण एकदिलाने काम करीत आहोत. राजकारणात कुणीच कायमचे शत्रू वा मित्र नसतात, हे अभिजित अडसूळ यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमच्यातील दुरावा मिटला आहे.

-रवी राणा, आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com