Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

काँग्रेसनं ६० वर्षात ज्या पायाभूत सुविधा दिल्या नाहीत त्या आम्ही दहा वर्षात दिल्या, असंही मोदी यावेळी म्हणाले.
PM Modi_Pune Rally Loksabha Election 2024
PM Modi_Pune Rally Loksabha Election 2024

पुणे : पुण्यातील नागरिक आणि एकूणच महाराष्ट्रातील नागरिक लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास करतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणेकरांना दिला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज रेसकोर्सच्या मैदानावर पार पडली, यावेळी मोदी बोलत होते.

मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, पुण्याचे उमेदवार मुरलीधऱ मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मोदींनी प्रचार केला. (Loksabha Election 2024 PM Modi Rally in Pune for Murlidhar Mohol Sunetra Pawar Shrirang Barne Shivajirao Adhalrao Patil)

मोदी म्हणाले, आधुनिक पायाभूत सुविधांमुळं आपल्यामध्ये एक विश्वास तयार होतो. यामध्ये पुणे मेट्रो पाहा, पुणे एअरपोर्टचं नवं रुप पाहा, पालखी मार्ग पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, ठिकठिकाणी जोडली जाणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन्स पाहा. हे सर्व आधुनिक भारताची प्रतिमा आहे, जिवंत उदाहरण आहे.

पुणे वासियांनी लिहून घ्या महाराष्ट्रातील माझ्या बहिणभावांनो ही मोदींची गॅऱंटी आहे की तो दिवसही आता येईल जेव्हा तुम्ही देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल. काँग्रेसनं आपल्या १० दहा वर्षात पायाभूत सुविधांवर जितका खर्च केला यामध्ये मनमोहन सिंग यांच्या रिमोटवाल्या सरकारनं दिल्या नाहीत त्या आम्ही दहा वर्षात दिल्या.

भारताच्या तरुणांनी सव्वा लाखांहून अधिक स्टार्टअप तयार केले. गर्वाची बाब ही आहे की यांपैकी अनेक हे आपल्या पुण्यात आहेत. आम्ही रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे जे आमचं मिशन आहे, त्याचा परिणाम आता दिसतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com