Loksabha election 2024 : अखेर उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

पक्षाने शुक्रवारी वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघामध्ये नसीम खान, भाई जगताप यांच्या नावांची चर्चा होती. मात्र पक्षाने गायकवाडांना तिकीट दिलं आहे. त्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये लढण्यासाठी इच्छूक होत्या.
varsha gaikwad
varsha gaikwadSakal

Varsha Gaikwad : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना पक्षाने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन पक्षात नाराजी पसरली होती. त्यानंतर पक्षाने वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मतदारसंघातून संधी दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी नाराजी बोलून दाखवली होती. त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असूनही त्यांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारली होती.

varsha gaikwad
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचं आश्वासन

त्यानतंर दुसऱ्या दिवशी सकाळी वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही कामाला लागलो आहोत. आमचं काही म्हणणं असेल तर ते पक्षासमोर मांडू.मुंबईचं एक वेगळं अस्तित्व आहे, पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्याही काही अपेक्षा असतात, त्याचा विचार करण्याची गरज आहे.

ज्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते, त्या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज आहेत. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला होता.

varsha gaikwad
Loksabha election 2024 : मोदी अन् योगींना मंगळसूत्राचं काय घेणं-देणं; पंतप्रधानांच्या विधानावर अखिलेश यादवांचं प्रत्युत्तर

त्यानंतर पक्षाने शुक्रवारी वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघामध्ये नसीम खान, भाई जगताप यांच्या नावांची चर्चा होती. मात्र पक्षाने गायकवाडांना तिकीट दिलं आहे. त्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये लढण्यासाठी इच्छूक होत्या. मात्र ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने त्यांनी उत्तर मध्यमधून लढणं पसंत केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com