Rajapur Loksabha : संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरेश्वर जोशी; 'या' योगदानामुळं काँग्रेसनं शिक्षकावर सोपवली मोठी जबाबदारी

संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे रेटण्यासाठी काँग्रेसअंतर्गत १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली.
LokSabha Elections Moreshwar Joshi
LokSabha Elections Moreshwar Joshiesakal
Summary

मोरेश्‍वर जोशी यांचा मूळ पिंड शिक्षकाचा होता. पदवीनंतर १९२२ ला राष्ट्रीय शिक्षण शाळेत त्यांनी शिक्षकाचीच नोकरी केली.

-सतीश पाटणकर

सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापनेसाठी केलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र (Samyukta Maharashtra) आंदोलन किंवा चळवळ असे म्हणतात. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली आणि १ मे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. १९५० ते १९६० या काळामधील महाराष्ट्रातील हे सर्वांत व्यापक असे जनआंदोलन होते.

संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे रेटण्यासाठी काँग्रेसअंतर्गत १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते शंकरराव देव या परिषदेचे अध्यक्ष झाले. १९५२ मध्ये सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन झाली. मोरेश्‍वर जोशी (Moreshwar Joshi) यांची राजकारणातल्या योगदानामुळे १९४६ ला मुंबई विधानसभेवर रत्नागिरी उत्तर मतदारसंघातून निवड झाली. त्यानंतर १९५२ ला लोकसभेची निवडणूक झाली. राजापूर मतदारसंघातून (Rajapur Constituency) काँग्रेसचे खासदार (Congress MP) म्हणून ते निवडून गेले.

LokSabha Elections Moreshwar Joshi
मगरींनी वेढलेल्या नदी पात्रात 5 दिवस जगण्याचा संघर्ष; अन्नाअभावी आदित्यने चिखल खाऊन मृत्यूशी केली झुंज!

खासदारकीच्या काळात त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पाठपुरावा केला. कोकणच्या विकासासाठी खाण उद्योगासह इतर औद्योगिक क्षेत्रांबरोबरच कोकण रेल्वेची मागणी सभागृहात ठामपणे मांडणारे ते पहिले लोकप्रतिनिधी. मोरेश्‍वर दिनकर जोशी ऊर्फ तात्या जोशी हे कोकणातल्या रत्नागिरीचे. मोरेश्‍वर जोशी यांचा मूळ पिंड शिक्षकाचा होता. पदवीनंतर १९२२ ला राष्ट्रीय शिक्षण शाळेत त्यांनी शिक्षकाचीच नोकरी केली. त्याच वर्षी सरस्वतीताई तात्यांच्या सहचारिणी झाल्या. नंतरच्या चार वर्षांत विधी महाविद्यालयामधून एल. एल. बी. पदवी घेऊन तात्यांनी १९२६ ते १९३० या काळात विल्सन विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. इथे मोरोपंतांना जाणवले की, आपला जीव मुंबईत रमणे कठीण असून रत्नागिरी हीच आपली कर्मभूमी आहे.

परिणामी त्यांनी १९३१ ला रत्नागिरीत स्थलांतर केले. मुंबईत बी. ए. आणि एल. एल. बी. पदवी घेऊन तात्यांनी कोकणच्या रत्नागिरी परिसरात १९५० ते १९७८ या काळात एक व्रत म्हणून शिक्षणाचा प्रसार केला. रत्नागिरीत आल्यावर तात्यांनी चरितार्थासाठी वकिली सुरू केली. याचवेळी रत्नागिरीतल्या ‘बळवंत’ या स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. देशातल्या स्वातंत्र्य चळवळीने उग्र रूप घेतले होते. ‘कोकणचे गांधी’ अशी ओळख मिळालेल्या अप्पा पटवर्धनांनी कोकणात काँग्रेसच्या या चळवळीचे नेतृत्व केले. राजकारण आणि समाजकारण यात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, अप्पा पटवर्धन, विनोबा भावे ही दिग्गज व्यक्तिमत्त्व तात्यांची स्फूर्तिस्थाने होती.

LokSabha Elections Moreshwar Joshi
Sangli Loksabha : ठाकरेंचा ‘शब्द’, काँग्रेसला ‘कोडे’; सांगलीचा तिढा सुटणार कसा? चंद्रहारच्या घोषणेनंतर ठिणग्या

अध्यात्माच्या संदर्भात स्वामी स्वरूपानंद त्यांचे आदर्श होते. स्थानिक वृत्तपत्राचा संपादक या नात्याने त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग अनिवार्य होता. म्हणूनच १९४२ च्या ‘भारत छोडो’ चळवळीतल्या सहभागामुळे त्यांना ३० महिन्यांचा कारावास झाला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, गोगटे महाविद्यालयाचे संस्थापक-संवर्धक, जोगळेकर व्यापारी महाविद्यालयाचे संस्थापक आणि २२ वर्षे सर्वोदय छात्रालयाचे कुशल व्यवस्थापक आणि दलित-मित्र या भावनेने विद्यार्थ्यांचे सर्वार्थाने मार्गदर्शक ही तात्यांची खरी ओळख. गांधीजींच्या असहकार चळवळीतही सामील झाले. बाळासाहेब खेर यांचे दातृत्व आणि मोरोपंतांचे आदर्श अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने रत्नागिरीत सर्वोदय छात्रालय १९४९ ला स्थापन झाले.

LokSabha Elections Moreshwar Joshi
Kolhapur Loksabha : शामराव माळी यांचं 'घोडा' चिन्ह अन् काँग्रेस उमेदवाराचा फक्त 165 मतांनी झाला पराभव

सामाजिक व आर्थिक बाबतीत दलित असलेल्या जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांना शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी रत्नागिरीत विनामूल्य निवास आणि भोजनाची व्यवस्था पुरवणे हे या छात्रालयाचे मुख्य ध्येय होते. आजपर्यंत १२०० मुलांनी छात्रालयात राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी काही मुले निवडक क्षेत्रात नामवंत झाली. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, माजी राज्यमंत्री लक्ष्मणराव हातणकर, उपायुक्त श्रीकांत धाडवे, माजी आमदार विठ्ठलराव कळंबटे, शामराव नेने हे छात्रालयाचे लाभार्थी. मोरोपंत जोशी यांनी छात्रालयातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संधी मिळवून देण्याबरोबर त्यांच्यावर सुसंस्कारही केले. लोकसभेची १९५७ ची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गाजली.

LokSabha Elections Moreshwar Joshi
Ichalkaranji Loksabha : इचलकरंजीत पाच निवडणुकांत तीन वेगवेगळ्या खासदारांना साथ; माने विरुद्ध आवाडे लढत ठरली निर्णायक

यात पराभव झाल्यानंतर तात्यांनी निवृत्ती पत्करली आणि शिक्षणक्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतले. जवळजवळ सव्वीस वर्षे ‘बळवंत’चे संपादक असलेल्या तात्यांनी १९५७ ला हे पद सोडले. त्याचवेळी अप्पासाहेब पटवर्धनांनी ‘नवकोकण’ साप्ताहिकाची कल्पना प्रत्यक्षात आणली आणि त्याच्या संपादनाची जबाबदारी मोरोपंतांवर आली. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचा रत्नागिरी परिसरात प्रचार हे नवकोकणचे मुख्य उद्दिष्ट होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९७७ ला ‘नवकोकण’ त्यांनी श्री. भिसे यांच्याकडे सोपवले.

अस्पृश्यता निवारण (१९३५-६०), पत्रकारिता ‘बळवंत’ (१९३१-५७) आणि ‘नवकोकण’ (१९५७-७७) आणि शिक्षणक्षेत्र (सर्वोदय छात्रालय १९५०-७८) यांत मोरोपंतांचे योगदान मोठे आहे. तात्या जोशी यांचा अनेक स्तरावर गौरव झाला. त्यातले नोंद घेण्याजोगे पुरस्कार आहेत ते स्वातंत्र्यसैनिक हे मानचिन्ह आणि महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र हा पुरस्कार.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com