Archana Patil: महायुतीचा धारशिवचा उमेदवार अखेर ठरला! ओमराजे निंबाळकरांविरोधात लढणार अर्चना पाटील

अर्चना पाटील या राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी आहेत. त्यांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Archana Patil
Archana Patil

मुंबई : महायुतीचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला असून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आता अर्चना पाटील लढणार आहेत. त्या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत. नुकताच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर धाराशिवमधून त्यांची उमेदवारी देखील घोषित झाली आहे. (Mahayuti Dharshiv candidate is finally decided Archana Patil will fight against Omraj Nimbalkar)

Archana Patil
Lok Sabha Election 2024: भाजपला 'या' जागेवर अजूनही का देता आला नाही उमेदवार?, PM मोदी स्वत: घेणार निर्णय

धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्यानं आता राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील मैदानात उतरल्या आहेत. ही जागा राणा जगजितसिंह पाटील यांनी लढवावी, असा प्रस्ताव यापूर्वीच अजित पवार यांनी दिला होता. (Latest Marathi News)

Archana Patil
Marathi News Live Update: आमदार प्रतिभा धानोकरांनी घेतली वडेट्टीवारांची भेट

मात्र, सध्या भाजपात असणाऱ्या राणा पाटील यांनी यासाठी साफ नकार दिला आहे. राणा जगजितसिंग पाटील यांनी आज सकाळीच अजित पवारांची भेट घेतली होती. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com