Loksabha Election Result : अनेक केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का

देशात १८ व्या लोकसभा निवडणुकीत ५० पैकी १३ हून अधिक केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
Loksabha Election Result
Loksabha Election Resultsakal

नवी दिल्ली : देशात १८ व्या लोकसभा निवडणुकीत ५० पैकी १३ हून अधिक केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांना कॉंग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी १.६७ लाख मतांनी पराभूत केले असून तिरुअनंतपुरम मतदारसंघात कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना १६ हजार मतांनी पराभूत केले आहे. लखीमपूर खेरी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना समाजवादी पक्षाचे उत्कर्ष वर्मा यांनी ३४ हजार मतांनी पराभूत केले आहे. अजय मिश्राचे सुपुत्र आशिष टेनी यांच्यावर आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप आहे. त्यात ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

  • अर्जुन मुंडा : खुंती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय आदिवासी व्यवहार आणि कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांना कॉंग्रेसचे नेते कालिचरण मुंडा यांनी १ लाख ४९ हजार ६७५ मतांनी पराभूत केले.

  • आर. के. सिंह : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांचा अराह मतदारसंघात सीपीआय(एमएल)चे उमेदवार सुदामा प्रसाद यांच्याकडून ५९,८०८ मतांनी पराभव झाला.

  • कैलास चौधरी : बारमेर मतदारसंघातील केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांना कॉंग्रेसचे उमेदवार उमेदा राम बेनीवाल यांच्याकडून ४.४८ लाख मतांनी पराभव पत्करावा लागला.

  • एल. मुरगन : केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन खात्याचे मंत्री एल. मुरूगन यांना निलगिरी मतदारसंघात द्रमुकचे उमेदवार ए.राजा यांच्याकडून २ लाख ४० हजार ५८५ मतांनी पराभव पत्करावा लागला.

  • निशिथ प्रामाणिक : केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांचा कुचबिहार मतदारसंघात तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार जगदिश चंद्र बासुनिया यांच्याकडून ३९ हजार मतांनी पराभव झाला.

  • भगवंथ खुबा : बिदर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री भगवंथ खुबा यांचा सागर खांदरे यांच्याकडून पराभव झाला.

  • कौशल किशोर : मोहनलालगंज (राखीव) मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि गृहनिर्माण आणि शहर विकास राज्यमंत्री कौशल किशोर यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार आर.के. चौधरी यांच्याकडून पराभव झाला. किशोर यांना ५,९७,५७७ तर चौधरी यांना ६,६७,८६९ मते मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com